नाशिक : नाशिक जिल्ह्यातील हरसूलमधील हिरडी गावात ग्रामपंचायतची विहीर खोदताना जिलेटीनच्या झालेल्या भीषण स्फोटात ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला.
लहू महाजन, विभीषण जगताप, आबा बोराडे अशी मृत मजुरांची नावे आहेत. हे सर्व मजूर बीड जिल्ह्यातल्या आष्टीचे रहिवासी असल्याचे समजते.
या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.