Sunday, July 6, 2025

महाबळेश्वरमध्ये पावसाने पर्यटकांची दाणादाण, तर राज्यात पुढील चार दिवस उष्णतेपासून सुटका

महाबळेश्वरमध्ये पावसाने पर्यटकांची दाणादाण, तर राज्यात पुढील चार दिवस उष्णतेपासून सुटका

सातारा: महाबळेश्वरमध्ये सध्या ढगफुटीसदृश्य पावसाने पर्यटकांची दाणादाण उडवली आहे. तुफान वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज सकाळपासूनच महाबळेश्वरमध्ये पावसाचं वातावरण दिसत होतं. त्यात दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली.


दरम्यान, उद्यापासून म्हणजे गुरुवारपासून पुढील चार दिवसांत राज्यातील जनतेला उष्णतेपासून दिलासा मिळणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. पुढील चार दिवसांत संपूर्ण राज्यातील कमाल तापमानात घट होणार असल्याची माहिती पुणे वेध शाळेचे प्रमुख डॉ. के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा