नाशिक: काल प्रयागराज येथे झालेल्या गॅंगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांच्या हत्येच्या आधी अतिकचा भाऊ काल मीडियाला बाईट देताना गुड्डू असा शब्द उच्चारत होता. त्याच गुड्डूचे नाशिक कनेक्शन उघडकीस आले आहे. गुड्डूला आज नाशिकमधून पकडण्यात आल्याची माहिती यूपी पोलिसांच्या विशेष पथकाने जाहीर केली आहे.
उमेश पाल हत्याकांडात गँगस्टर अतिक अहमद, त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांच्या हत्येआधीपासूनच यूपी पोलिसांचे पथक गुड्डूचा शोध घेत होते. गुड्डू हा नाशिकमधील एका हॉटेलमध्ये लापल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी रात्रीच गुड्डूला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रविवारी त्याला अटक केली.
गुड्डू मुस्लिम हा अतिक गँगचा सदस्य आहेत. उमेश पाल हत्याकांडात त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे आहेत. उमेश पालवर त्याने बॉम्ब फेकल्याचा आरोप त्याच्यावप आहे. गुड्डू बम्बाज असे त्याचे टोपण नाव आहे.
गुड्डू हा अट्टल गुन्हेगार असून, तो शाळेपासून गुन्हेगारी जगतात आहे. तो देशी बॉम्ब बनविण्यात तरबेज झाल्यावर मोठ्या गुन्हेगारी जगतात सहभागी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.