गुजरातच्या गोलंदाजीसमोर पंजाबचे लोटांगण

  53

६ विकेट राखून टायटन्सची सरशी; मोहित शर्मा, राशिद खान चमकले


मोहाली (वृत्तसंस्था) : मोहित शर्मा, राशिद खान यांच्यासह गुजरातच्या भेदक गोलंदाजीमुळे पंजाबचा डाव अवघ्या १५३ धावांवर गडगडला. प्रत्युत्तरार्थ शुभमन गिलने अर्धशतक झळकावल्याने गुजरातने पंजाबविरुद्ध बाजी मारली. गुजरातचा हा यंदाच्या हंगामातील तिसरा विजय ठरला.


प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सने बरी सुरुवात केली. रिद्धीमान साहा आणि शुभमन गिल या सलामीवीरांच्या जोडीने धावफलकावर बिनबाद ४८ धावा झळकावल्या. ३० धावा करणाऱ्या साहाने साथ सोडल्यावर गिलने साई सुदर्शनच्या साथीने धावफलक हलते ठेवले. संयमी फलंदाजी करणाऱ्या साईलाही फार काळ मैदानात टिकता आले नाही. त्याने १९ धावा जमवत आपल्या खेळीला विराम दिला. कर्णधार हार्दिक पंड्यालाही फार काळ तग धरला नाही. त्याला दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही.

अवघ्या ८ धावा करत पंड्याने पॅवेलियनचा रस्ता पकडला. त्यानंतर गिलने डेविड मिलरच्या साथीने गुजरातला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. विजयासाठी अवघ्या ६ धावांची आवश्यकता असताना गिलचा संयम सुटला. गिलने संघातर्फे सर्वाधिक ६७ धावांचे योगदान दिले. मिलर आणि राहुल तेवतिया यांनी १९.५ षटकांत ४ फलंदाजांच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले. पंजाबच्या हरप्रीत ब्ररने चांगली गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत २० धावा देत एक बळी मिळवला.


गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाब किंग्सला निर्धारित २० षटकांत आठ विकेटच्या मोबदल्यात १५३ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबने पहिल्या सहा षटकांत म्हणजेच ‘पॉवरप्ले’मध्ये ५२ धावा करत २ विकेट गमावल्या होत्या. पंजाबच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. कर्णधार शिखर धवनसह प्रभसिमरन सिंह हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले.


गुजरातच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत पंजाबच्या फलंदाजांना ठराविक अंतराने तंबूत पाठले. मॅथ्यू शॉर्टने पंजाबकडून सर्वाधिक धावांची खेळी केली. शॉर्टने २४ चेंडूंत ३६ धावांचे योगदान दिले. भानुका राजापक्षा, जितेश शर्मा यांनी अनुक्रमे २०, २५ धावांचे योगदान दिले. सॅम करनने २२ धावा जोडल्या. तळात एम शाहरुख खानने ९ चेंडूंत २२ धावा तडकावत पंजाबला कसेबसे दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. गुजरातच्या मोहित शर्माने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. त्याने ४ षटकांत केवळ १८ धावा देत २ विकेट मिळवल्या.



रबाडाने मलिंगाला टाकले मागे


साहाची विकेट घेत कागिसो रबाडाने माजी स्टार गोलंदाज लसिथ मलिंगाला मागे टाकत आयपीएलमध्ये इतिहास रचला. आयपीएलमध्ये सर्वात जलद १०० बळी घेणारा खेळाडूचा विक्रम रबाडाच्या नावे झाला आहे. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सचा सुपरस्टार लसिथ मलिंगाच्या नावावर होता. कागिसो रबाडाने आपल्या ६४व्या आयपीएल सामन्यात ही कामगिरी केली. मलिंगाने आपल्या ७०व्या सामन्यात हा टप्पा गाठला. मलिंगाचा विक्रम जवळपास एक दशक टिकला. त्याने मे २०१३ मध्ये आयपीएलमध्ये १०० बळी पूर्ण केले होते. भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, त्याने ७९ डावांत १०० बळी पूर्ण केले आहेत.

Comments
Add Comment

हॉकी एशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार ?

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील गेल्या काही महिन्यांपासून तणावाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयातील

ENG vs IND: शुभमन गिलने द्विशतक ठोकत रचला इतिहास, कोहलीचा रेकॉर्ड मोडला

एजबेस्टन: इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन कसोटीत कर्णधार शुभमन गिलचा जलवा पाहायला मिळत आहे. शुभमन गिलने भारताच्या

ENG vs IND: शुभमन गिलचे शतक, पहिल्या दिवशी भारत तीनशेपार

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून एजबेस्टनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या

UAE मध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

अबुधाबी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होणार असल्याचे वृत्त आहे. आशियाई

Ind vs Eng: भारत वि इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात

मुंबई: कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची