श्रीरामपूर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांना एकाने हत्या करण्याची धमकी दिलीय. मी १ मे रोजी अण्णा हजारे यांना संपवणार असल्याचं एक पत्रच एका शेतकऱ्याने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे पाठवलंय.
अण्णा हजारे यांना आलेल्या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधनी या शेतकऱ्याने हे पत्र पोलिसांना पाठवलं आहे. गायधनी यांचे शेतीचे वाद आहेत. त्यामध्ये हजारे लक्ष घालत नसल्याचा आरोप त्याने केला आहे. यामुळे त्याने १ मे रोजी राळेगणसिद्धी येथे जाऊन हत्या करणार असल्याची धमकी दिली आहे.
त्याने पत्रात असं म्हटलंय की, मी एक सर्वसामान्य शेतकरी असून माझ्या कौटुंबिक शेतीच्या वादाच्या कारणातून माझ्या गावातील ९६ लोकांनी एकत्र येऊन माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे.
तसेच शेलार बाई नावाच्या दलित महिलेने माझ्यावर खोटी ॲट्रॉसिटी (Atrocity) केस दाखल करण्याचा कट रचला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास मी १ मे रोजी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे साहेब यांची हत्या करणार असल्याचा इशाराच या शेतकऱ्याने दिला आहे.
या प्रकरणाबाबत मी सविस्तर तक्रार श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे दिलेली असून याची नोंद घ्यावी, अशी विनंती धमकी देणाऱ्या शेतकऱ्याने केलीय.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…