विनायक राऊतला नारायण राणेच धडा शिकवू शकतात....

संजय शिरसाट यांचे विधान


छत्रपती संभाजीनगर : विनायक राऊतची औकात काय? त्याला प्रत्युत्तर फक्त केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेच देऊ शकतात. विनायक राऊतला धडा शिकवण्याची धमक माननीय नारायण राणे यांच्याकडेच आहे व ते त्यांना पुरुन उरलेत, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी विनायक राऊत यांच्यावर चांगलाच निशाणा साधला.


विनायक राऊत वांरवार शिवसेनेवर आरोप करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर त्यांनी टीका करत त्यांनी शिवसेनेतील आमदार बंडखोरी करणार आहेत, असा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना नाही तर उद्धव गटाचे आमदार बंडखोरी करणार आहेत. तेच आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला.


विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेविरोधात असे बोलणे शोभत नाही असा टोला लगावत विनायक राऊत यांना नारायण राणेच धडा शिकवू शकतात, असे संजय शिरसाट म्हणाले.

Comments
Add Comment

बीडमधील अजब प्रकार, अधिक महिन्याचं वाण थेट मांजराच्या पोटात

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील टाकरवण परिसरातील एका गावात अधिक मासानिमित्त घडलेल्या एका अनोख्या घटनेची सध्या जोरदार

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; खासगी ट्रॅव्हल्सची बस ट्रकवर आदळली, २५ प्रवासी जखमी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाला आहे. रविवारी मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ झालेल्या

Mumbai Goa National Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अल्टो कार २५ फूट दरीत कोसळली; पाच जण गंभीर जखमी

Jalna Bribe Case : पार्टी सुरू व्हायच्या आधीच वाजले बारा! एसीबीने जालनाच्या तहसीलदारांच्या घरात टाकला छापा

जालना: जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांना लाच (Bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक

Chitra Wagh : डहाणूतील संतापजनक प्रकरणावर चित्रा वाघ आक्रमक; दोन बहिणींवरील अत्याचारप्रकरणी कठोर कारवाईची मागणी

डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे घडलेल्या एका लव्ह जिहादच्या गंभीर प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या

Nashik TCS Case : नाशिकमधील आयटी कंपनीशी संबंधित प्रकरणात नवा दावा; निदा खानने केला 'त्या' घटनेचा खुलासा

नाशिक : नाशिकमधील एका आयटी कंपनीशी संबंधित कथित लैंगिक छळ (sexual harassment) आणि धर्मांतर प्रकरणाचा (Religious conversion) तपास सुरू