'महाराष्ट्र शाहीर' मध्ये बाळासाहेबांची भूमिका कोणी केलीय माहितीय का?

मुंबई: महाराष्ट्राची परंपरा खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचवणारे, आपल्या शाहिरीने लोकांना प्रेमात पाडणारे, गाण्यातून समाजप्रबोधन करणारे शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट येत्या २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अंकुश चौधरी, सना शिंदे, निर्मिती सावंत, यांसारख्या कलाकारांची फौज चित्रपटात पाहायला मिळणार आहे.


या ट्रेलरवर प्रेक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. ट्रेलरची सुरुवात आणि गाणी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या ट्रेलरने प्रदर्शनासोबतच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काही तासातच या ट्रेलर ६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. प्रदर्शित होताच हा ट्रेलर युट्यूबवर सातव्या क्रमांकावर ट्रेंडिंग करत आहे.


शाहीर साबळेंशिवाय सिनेमात यशवंतराव चव्हाण, लता मंगेशकर, साने गुरूजी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे देखील दिसणार आहे.


आजवर अनेक सिनेमांमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिका अनेक कलाकारांनी साकारल्या. महाराष्ट्र शाहीरमध्ये देखील बाळासाहेब ठाकरे प्रेक्षकांना दिसणार आहेत. महाराष्ट्र शाहीर सिनेमात अभिनेता दुश्यंत वाघ याने बाळासाहेबांची भूमिका साकारली आहे. दुश्यंतनं याआधी अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.


महेश मांजरेकरांच्या 'तेरा मेरा साथ रहना' या सिनेमात दुश्यंतनं एका मतिमंद मुलाची भूमिका करत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर २००५ मध्ये आलेल्या डोंबिवली फास्ट या सिनेमात त्यानं माधव आपटेच्या मुलाची भूमिका केली. २००९ मध्ये आलेल्या 3 इडियट्स या सिनेमा त्याने सेंटीमीटर ही प्रसिद्ध भूमिका साकारली होती.


अर्जुन कपूरच्या पानिपत सिनेमातही दमदार भूमिका साकारली. नुकत्याच आलेल्या धर्मवीर या सिनेमातही दुश्यंतनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. मन उधाण वाऱ्याचे या प्रसिद्ध मराठी मालिकेतही दुश्यंतनं काम केलंय.

Comments
Add Comment

अरबाज खान झाला बाबा, पत्नी शुरा खानने दिला मुलीला जन्म

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांना रविवारी मुलगी झाली. ५८ व्या वर्षी अरबाज

'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात

मुंबई : 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतीच कोकण हार्टेड गर्ल

“जॉली एलएलबी ३” ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; अर्शद वारसी आणि हुमा कुरेशीसाठी ठरतोय गेमचेंजर

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट प्रेक्षकांकडून भरभरून

रिया चक्रवर्तीला दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाने पासपोर्ट परत करण्याचे दिले आदेश!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : मॅनेजरनेच दिले विष, समोर आली धक्कादायक माहिती

सिंगापूर : सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग याचा १९ सप्टेंबरला सिंगापूर येथे नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिवल दरम्यान बुडून

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन; वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास!

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता व्ही. शांताराम यांच्या पत्नी, ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्री संध्या