म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी मे महिन्यात सोडत

गोरेगाव, अँटॉप हिल, विक्रोळी, प्रतीक्षा नगर आणि दक्षिण मुंबईतील ४ हजारांहून अधिक घरांचा सोडतीमध्ये समावेश


मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत जाहीर झाली असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. याच दरम्यान म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सुमारे चार हजारांहून अधिक घरांची सोडत काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून मुंबई मंडळाला प्राप्त झालेल्या घरांची किंमत निश्चित करण्याचे काम अंतिम टप्यात आले असून मे महिन्यात सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल, विक्रोळी कन्नमवार नगर , प्रतीक्षा नगर आणि दक्षिण मुंबईतील घरांसह इतर विखुरलेल्या गाळ्यांचा समावेश असणार आहे.


याआधी सोडतीसाठी घरे उपलब्ध होऊ न शकल्याने म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत गेले काही वर्षे काढण्यात आली नाही. मुंबई मंडळाने हाती घेतलेले प्रकल्प अंतिम टप्यात पोहचले असल्याने मंडळाने दिवाळीमध्ये सोडत काढण्याची तयारी सुरु केली होती. त्यामुळे मुंबईकरांची उत्सुकता वाढली. मात्र सोडतीच्या सॉफ्टवेअरचे काम पूर्ण न झाल्याने सोडत काढता आली नव्हती.


अखेर जानेवारी महिन्यात सोडत काढण्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या सोडतीमध्ये अधिकाधिक घरांचा समावेश करण्यासाठी गेले काही महिन्यांपासून मंडळाकडून प्रयत्न सुरु आहेत. सोडतीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विविध विभागांनी घरांची संख्या अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविलेली नाही. तसेच मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून मुंबई मंडळाला सोडतीसाठी मिळालेल्या घरांच्या किमती निश्चित करण्याचे काम अंतिम टप्यात आहे.


पुढील दोन आठवड्यात घरांच्या किमती अंतिम करून मे महिन्यात सोडत काढण्यात येईल, असे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

नामनिर्देशन पत्रे, निवडणूक खर्च आणि आचारसंहितेबाबत राजकीय पक्षांना दिली माहिती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता निवडणूक प्रक्रिया पूर्णतः

सामान्य प्रशासन विभागाकडून तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात ए. शैला, डॉ.

पर्यटकांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेवर नाताळ-नवीन वर्षासाठी विशेष गाड्या

मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या

Manikrao Kokate : माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचली!

सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती; आमदारकी कायम राहणार, पण लाभाचे पद धारण करता

वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार

एमएमआरडीए उभारणार नवा पादचारी पूल मुंबई  : वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक आणि लकी हॉटेल जंक्शन परिसरातील तीव्र

मढ-वर्सोवा केबल पूल लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबईतील रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी