
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेला जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे हसन मुश्रीफांवर अटकेची टांगती तलवार आहे.
मुश्रीफ यांच्याकडून आता हायकोर्टात आव्हान देण्यात येणार आहे. हायकोर्टात आव्हान देण्याकरता हसन मुश्रीफ यांना अटकेपासून तीन दिवसांचा अंतरिम दिलासा मिळाला आहे. येत्या १४ एप्रिलपर्यंत मुश्रीफ यांना अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे.