‘ज्ञानेश्वर माऊली’ने गाठला ५०० भागांचा टप्पा


  • ऐकलंत का!: दीपक परब


'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकेने संतांची परंपरा उलगडत प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केले आहे. माऊली आणि त्यांची भावंडे यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारे काही प्रेक्षकांना खूपच भावले. ‘ज्ञानेश्वर माऊली’ मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. या मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळते आहे. आळंदीच्या ग्रामस्थांना माऊलींच्या दिव्यत्वाचे दर्शन वेळोवेळी होते आहे. माऊली आणि त्यांची भावंडे यांचे चमत्कार ग्रामस्थांना पाहायला मिळाले.


या मालिकेत माऊली आणि त्यांची भावंडे यांच्याबरोबरच संत सेना महाराज यांची भेट झाली. आतापर्यंत निरनिराळे संत आणि त्यांची मांदियाळी आपल्याला या मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळाली असून मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे.


‘ज्ञानेश्वर माऊली’ मालिकेचे ५०० भाग पूर्ण होत आहेत. रविवारी ९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वा. मालिकेचा महाएपिसोड सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. माऊलींचे चमत्कार आपल्याला यापुढेही पाहायला मिळतील. आता माऊलींच्या कार्यात ग्रामजोशी पुन्हा अडथळा निर्माण करताना दिसणार आहेत. त्यांना माऊली आणि त्यांची भावंडे कशाप्रकारे सामोरे जाणार, हे पाहायला मिळणार आहे.


दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर निर्मित ही मालिका गेले अनेक महिने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करते आहे. माऊलींचे चमत्कार, त्यांनी केलेले गीता पठण यातून प्रेक्षकांना ज्ञानेश्वरांबद्दलची माहिती मिळाली. मालिकेत दाखविलेली गोष्ट प्रेक्षकांना भावली आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या मनात मालिकेने स्थान निर्माण केले आहे.



नंदेश उमप संत सेना महाराजांच्या भूमिकेत


संत सेना महाराज यांची भूमिका नंदेश उमप साकारत आहे. नंदेश उमप हे संगीत क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या या वेशाची, पेहरावाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. त्यांच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. संत सेना महाराज आणि संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे यांची भेट कशी होते, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्कंठा वाढवणारे असेल.

Comments
Add Comment

“त्यांनी मला शिक्षकासारखे सगळे समजावून सांगितले”

मुंबई : क्रांती प्रकाश झा हे भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक ओळखले जाणारे अभिनेते आहेत. त्यांनी चित्रपट आणि वेब

'सनई चौघडे' मध्ये पहिल्यांदाच आईची भूमिका साकारणार अदिती सारंगधर

मुंबई : ‘सनई चौघडे’ मालिकेत लाडकी अभिनेत्री अदिती सारंगधर एका दमदार आणि महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत

अक्षय कुमारच्या भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, टीझर गुरुवारी प्रदर्शित होणार

मुंबई : बालाजी मोशन पिक्चर्सने भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता

तब्बल १३ वर्षांनी अभिजीत सावंतने गायलं मराठी सिनेमासाठी गाणं, नवीन गाण्यातून वेगळीच झलक प्रेक्षकांसमोर

मुंबई: इंडियन आयडियल १ चा विजेता, बिग बॉस मराठी ५ चा रनर अप आणि लाखो मुलींची धडकन अभिजीत सावंत. हिंदीत मोहबते

सोशल मीडिया स्टार अरुण तुपे याचे अकाली निधन; काय आहे मृत्यूचे कारण...

मुंबई : विनोद शैलीने चाहत्यांना खळखळून हसवणारा शिवाय उत्कृष्ट कन्टेन्टने प्रेक्षकानं भारावून सोडणारा छत्रपती

अखेर मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा घरी परतला; मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मध्यपूर्वेत युद्ध पेटले आहे. त्यामुळे वाहतूक ही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.