मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं श्री राम लल्लांचं दर्शन
अयोध्या: अयोध्याचं वातावरण भगवे झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करुन दाखवलं. मंदिर वही बनायेंगें तारीख नही बतायेंगेच्या फुका घोषणा करण्यांचा समाचार यावेळी एकनाथ शिंदे यांनी घेतला. ते म्हणाले, हे कधी मंदिर बांधणार याची तारीख त्यांच्याकडून निश्चित होत नव्हती. पण नरेंद्र मोदी यांनी हा संकल्प केला व सिद्धीस नेला, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राम मंदिर बांधण्यात नरेंद्र मोदी यांचे योगदान जनतेसमोर मांडले.
महाराष्ट्र सुजलाम – सुफलाम करु
बळीराजावरचं संकट दूर व्हावं, जनतेच्या आयुष्यात सुखाचे दिवस यावेत यासाठी प्रार्थना आम्ही केली आहे. तसेच श्री राम लल्लांच दर्शन घेऊन येथून ऊर्जा, प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्रात जाऊ. महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होईल यासाठी प्रयत्न करु असेही मुख्यंमत्र्यांनी यावेळी सांगितले.
श्री राम लल्लांच्या आणि मंदिर यही बनायेंगेच्या जयघोषात एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री रामलल्लाचं दर्शन घेतलं. त्यांच्याबरोबर असलेले सर्व मंत्री आणि आमदारांनी देखील रामलल्लाचं दर्शन घेतं सर्वांनी एकत्र महाआरतीही केली. यावेळी शिंदे यांनी बाळासाहेबांनी पाहिलेल्या राम मंदिराच्या स्वप्नाची आठवण काढली.
श्री रामाने सगळं दिलं
राम प्रभुचं दर्शनं घेतलं याचा मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, प्रभू रामाचं दर्शन घेऊन आनंद झाला आहे. एक स्वप्न पूर्ण झालं आहे. रामाकडं काही मागायची गरज नाही सगळं मिळत, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मंदिर पूर्ण झाल्यानंतर मी परत येईनच असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून श्री रामाला धनुष्यबाण अर्पण
यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिराच्या बांधकामाची पाहाणी केली. तसेच श्री रामाला धनुष्यबाण अर्पण केला. महाराष्ट्रात आता शिवसेना-भाजपचं सरकार आहे त्यामुळे कोणत्याही हिंदूवर अन्याय होणार नाही, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. हनुमान चालीसा पठण करणाऱ्या नवनीत राणा आणि रवि राणा यांना जो त्रास दिला गेला याचाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी समाचार घेत त्यांना त्रास देणारे राम होते की रावण असा जळजळीत सवाल उपस्थीत केला. हिंदूंच्या रक्षणाची भाषा करणारं सरकार पालघरमध्ये साधू हत्या झाली त्यावेळी कुठे होतं असा सवालही एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.
राम मंदिराच्या बांधकामात महाराष्ट्राचा खारीचा वाटा…
अयोध्येतील श्री राम मंदिरासाठी लागणारं सगळं सागवान लाकूड महाराष्ट्रातून जाईल अशा शब्दांत महाराष्ट्र राममंदिराच्या बांधणीत कसा खारीचा वाटा उचलणार आहे हे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आणि राम लल्लांच्या नावाचा एकच जयघोष झाला.