नवा लुक होतोय व्हायरल
कर्नाटक (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कर्नाटक दौऱ्यादरम्यान व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासह ‘द एलिफंट विस्फरर्स’ या माहितीपटातील जोडप्याची अर्थात बोमन आणि बेलीची आणि रघुची भेट घेतली.
नरेंद्र मोदी यांचे बोमन आणि बेलीसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं आहे,”रघूसह बोमन आणि बेली यांना भेटून आनंद झाला”. ‘द एलिफंट विस्फरर्स’ या माहितीपटाला ऑस्कर मिळाला होता. त्यानंतर प्रतप्रधांनांनी या माहितीपटाच्या टीमची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं होतं.
What a delight to meet the wonderful Bomman and Belli, along with Bommi and Raghu. pic.twitter.com/Jt75AslRfF
— Narendra Modi (@narendramodi) April 9, 2023
म्हैसूरमधील ‘प्रोजेक्ट टायगर’ला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्याघ्र गणनेच्या अहवालाचे प्रकाशन केलं जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी जंगल सफारीसाठी खास लूक केला आहे. या नव्या लूकमध्ये पंतप्रधानांनी काळी टोपी, खाकी पँट, प्रिंटेड टी-शर्ट आणि काळे शूज यासह एका हातात स्लीव्हलेस जॅकेट दिसत आहे.