मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
अयोध्या: अयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान केली. शिंदे यांनी अयोध्या दौऱ्यावेळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ही महत्वाची आणि मोठी घोषणा केली. तसेच यावेळी उद्धव ठाकरेंवर टिका करत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश मी येथूनच दिले आहेत. मी घरी बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही असेही शिंदे यांनी म्हटले.
धनुष्यबाण मिळाल्यानंतर आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय मात्र ज्यांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे त्यांच्याकडून बदनाम करण्याचे काम केले जात आहे. तसेच काहीजण परदेशात जाऊन देशाला बदनाम करण्याचे काम करतायत. जनता सुज्ञ आहे. आम्ही आमचे विचार पुढे नेत जाऊ, असेही शिंदे म्हणाले.
फडणवीस दिल्लीला महत्वाच्या बैठकीला जात होते, ते अयोध्येला आले. आम्ही खुलेआम आलोय, आम्हाला कोणाचाही आड पडदा नाही, असेही शिंदे यांनी म्हटले.