वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एका पॉर्नस्टारला पैसे दिल्याच्या प्रकरणावरून अडचणीत सापडले आहेत. ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने काही आरोप केले आहेत. ट्रम्प सध्या पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याप्रकरणी चर्चेत आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू आहे. याप्रकरणामुळे ट्रम्प यांना आगामी निवडणूक लढवण्यात अडचणी निर्माण होणार असल्याचे दिसून येत असतानाच त्यांच्या मदतीसाठी खुद्द पॉर्नस्टार स्टॉर्मी ही धावली आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेत पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
गुन्हेगारी खटल्याला सामोरे जाणारे ट्रम्प अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. ट्रम्प आणि आपल्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आहे. ट्रम्प यांनी या प्रकरणावर आपण भाष्य करू नये यासाठी आपल्याला काही रक्कम देखील देऊ केली आहे. तिच्या या आरोपानंतर ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ झाली. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला ट्रम्प यांनी गप्प बसवण्यासाठी पैसे दिल्याबद्दल न्यायालयात खटला सुरू आहे. मात्र तिने आता ट्रम्प यांचा बचाव केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी तोंड बंद ठेवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसे दिल्याचा आरोप आहे. याबद्दल बोलताना स्टॉर्मी डॅनियल्स म्हणाली की, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील आरोप त्यांना जेलमध्ये टाकावे असे नाहीत. दरम्यान, माजी राष्ट्रपतींवरील अन्य प्रकरणांतील आरोप गंभीर असतील आणि तपासाअंती ते योग्य आढळले तर त्यांना तुरुंगात पाठवावे, असेही डॅनियल्सने म्हटले आहे.
स्टॉर्मी डॅनियल्सने अचानक घुमजाव केल्यामुळे आता तिच्यात आणि ट्रम्प यांच्यात नवा करार झालाय का? स्टॉर्मी डॅनियल्स ट्रम्प यांच्यावरील आरोप मागे घेणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. हे प्रकरण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या काही दिवसांआधीचे आहे. ऑक्टोबर २०१६च्या अखेरीस पॉर्न स्टार डॅनियल्सला त्याच्या तत्कालीन वैयक्तिक वकील मायकेल कोहेनच्या वतीने १ लाख ३० हजार अमेरिकन डॉलर्सचे पेमेंट केल्या संबंधित आहे. एका दशकापूर्वी ट्रम्प यांच्याशी असलेल्या कथित संबंधांबद्दल पॉर्न स्टारने कोणताही खुलासा करु नये. तसेच याप्रकरणा संबंधात कोणतीही वाच्यता करु नये यासाठी ही रक्कम पॉर्न स्टारला पुरवल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे.
कोर्टात बोलताना ट्रम्प यांनी आपण दोषी नसल्याचे न्यायाधीशांना सांगितले. ट्रम्प यांचे वकील टॉड ब्लँचे म्हणाले, ट्रम्प खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांना वाटते की कोर्टरूममध्ये त्यांच्यावर अन्याय होत आहे. आपण कोणताही गुन्हा केला नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते.
दरम्यान, ट्रम्प या खटल्याच्या सुनावणीसाठी मंगळवारी मॅनहॅटन न्यायालयात दाखल झाले होते. न्यायालयात हजर होण्यापूर्वी मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयात ट्रम्प यांना अटक करण्यात आली होती. मात्र, सुनावणीअंती त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. ट्रम्प यांच्यावर ३४ आरोप लावण्यात आले आहेत. न्यायालयाने त्यांना १.२२ लाख डॉलरचा दंडही ठोठावला आहे. हे पैसे अॅडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला दिले जाणार आहेत.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…