Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीबुकी अनिल जयसिंघानीच्या इडीने आवळल्या मुसक्या

बुकी अनिल जयसिंघानीच्या इडीने आवळल्या मुसक्या

अहमदाबाद: आयपीएल मनी लाँड्रिंग प्रकरणात इडीच्या अहमदाबाद युनिटने अनिल जयसिंघानीला मध्य प्रदेश पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अनिल जयसिंघानी याच्यावर आहे. दरम्यान, तो मद्यच्या अवैध्य व्यापाराच्या आरोपाखाली मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात होता.

क्रिकेट बुकी म्हणून ओळख असलेला अनिल जयसिंघानी हा मुंबईजवळील उल्हासनगरचा असून तो १५ हून अधिक प्रकरणांमध्ये संशयित आहे. सट्टेबाजी प्रकरणात त्याला याआधी तीन वेळा अटक झाली आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षा विरोधात लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अनिल जयसिंघानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात बेकायदेशीर अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने शुक्रवारी याचिका फेटाळून लावली.

ईडीकडून अहमदाबाद कोर्टात सुरु असलेल्या २०१५ मधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जयसिंघानी याची चौकशी सुरु आहे. चौकशी सुरु असताना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर इडीने न्यायालयात जयसिंघानी यांच्या कोठडीची मागणी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -