आमदार नितेश राणेंचा खा. संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल
संजय राऊत यांचे धमकी प्रकरण एक बनाव असल्याचे उघड
कणकवली (प्रतिनिधी) : मच्छरला मारण्यासाठी मोठे गँगस्टर लागत नाहीत. खा. संजय राऊत यांना आलेली धमकी ही दारूच्या नशेत कोणी युवकाने दिली होती. हे आता पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी धमकीवरून दोन दिवस केलेला थयथयाट हा निव्वळ तमाशा होता. पोलीस संरक्षण वाढवून घेण्यासाठी रचलेला बनाव होता. संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि त्याचा पेंग्विन आदित्य ठाकरे हे डरपोक नामर्द आहेत. त्यांचे पोलीस संरक्षण काढून घेतल्यास ते घराबाहेरही पडणार नाही. एवढे भित्रे आहेत, असा हल्लाबोल आमदार नितेश राणे यांनी केला. खा.संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे पोलीस संरक्षण काढून घ्यावे. अशी मागणीच आमदार नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान नितेश राणे यांनी याबाबत याधीही फेसबुकवर एक खरमरीत पोस्ट केली होती. काय आहे ती पोस्ट? वाचा बातमीच्या शेवटी…
प्रहार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदत आमदार नितेश राणे बोलत होते. ते म्हणाले, जेव्हा केंद्रीय मंत्री राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर सामना दैनिक कार्यालयासमोर सभा घेतली तेव्हा हा संजय राऊत संडासात ४ तास लपून बसला होता. जेव्हा उद्धव ठाकरे,राज ठाकरे सामनामध्ये आले तेव्हा हे संजय राऊत संडासाच्या बाहेर आले. संजय राऊत यांना ठार मारण्याची आलेली धमकी हा निव्वळ संजय राऊत यांचा पोलीस संरक्षण वाढवून घेण्यासाठी बनाव होता. संजय राऊत,उद्धव ठाकरे आणि त्याचा पेंग्विन हे डरपोक नामर्द असल्याचा हल्लाबोल आमदार नितेश राणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला.