आरसीबीच्या चाहतीने स्टेडियममध्ये झळकावले पोस्टर
कोलकाता (वृत्तसंस्था) : आपल्या आवडत्या संघाने विजेतेपद पटकावण्यासाठी त्यांचे चाहते काय काय निश्चय करतील सांगता येत नाही. आरसीबीने आयपीएलची ट्रॉफी जिंकल्याशिवाय लग्नच करणार नाही, असे एका चाहतीने ठरवले आहे. या आशयाचे पोस्टर एका चाहतीने कोलकाता आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान गुरुवारी स्टेडियममध्ये झळकावले. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयपीएलमध्ये आरसीबीला आतापर्यंत एकही चषक उंचावता आलेला नाही. प्लेऑफमध्ये अनेकदा पोहचूनही आरसीबीला ट्रॉफी उंचावता आलेली नाही. आरसीबीच्या कट्टर चाहत्यांच्या मनात ही खल कायम आहे. यंदाच्या हंगामाला अलिकडेच सुरुवात झाली असून यंदा तरी आरसीबीने हा दुष्काळ संपवावा अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.