राज्यात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा, १८ मे रोजी मतदान

मुंबई : राज्यातील विविध ग्रामपंचायतीमधील सदस्य आणि सरपंच यांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. आज राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे.


राज्यभरातील सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीमधील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांचा पोटनिवणुका होणार आहेत. त्यासाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे आज येथे देण्यात आली आहे. यासाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झालेली आहे.


निधन, राजीनामा, सदस्यत्व रद्द झालेले अथवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. यासाठी नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) २५ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत दाखल करता येणार आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ३ मे २०२३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ८ मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. १८ मे २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. तर नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १९ मे २०२३ रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

महिला शेतकऱ्यांच्या श्रमाला कायद्याचे कवच

विधानसभेत विशेष विधेयक; जमिनीची प्रत्यक्ष मालकी नसली तरी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा मुंबई (सुहास

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सियाचा व्हिडिओ व्हायरल

सिया-चेतनच्या कथित नात्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; तपासाला नवे वळण? पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या

Vidhan Sabha : महत्त्वाच्या चर्चेवेळी अधिकाऱ्यांची दांडी, नगरविकास सचिवांना विधानसभा अध्यक्षांची नोटीस

मुंबई : मुंबईशी (Mumbai) संबंधित अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर विधानसभेत चर्चा सुरू असताना, अधिकारी

Maharashtra Rain Alert : हवामान विभागाचा इशारा: राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढचे १०० तास महत्त्वाचे

पुढील आठवड्यात महाराष्ट्रात दमदार पाऊस  मुंबई : पुणे वेधशाळेने ५ ते ७ जुलैदरम्यान महाराष्ट्रभर समाधानकारक ते

Nitesh Rane : मुंद्रा पोर्टच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार – नितेश राणे

आधुनिक बंदर व्यवस्थापनाचा महाराष्ट्राला लाभ; करण अदानींसोबत नितेश राणेंची चर्चा News: मुंबई : महाराष्ट्राचे

Pankaja Munde : वाडी नगरपरिषदेचा एसटीपी प्रकल्प ३० ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होणार

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांची विधान परिषदेत ग्वाही मुंबई : नागपूर जिल्ह्यातील वाडी नगरपरिषदेच्या हद्दीतील