पृथ्वी शॉने चुकांमधून शिकले पाहिजे, वीरेंद्र सेहवागने दिला सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली कॅपिटल्सचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयशाचा सामना करावा लागला. या दोन्ही सामन्यांमध्ये तो झटपट बाद झाला. पृथ्वीच्या या निराशाजनक कामगिरीवीर भारताचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग नाराज आहे. पृथ्वी शॉने आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे, असा सल्ला सेहवागने दिला.


क्रीडा वाहिनीवरील एका कार्यक्रमात सेहवाग म्हणाला की, पृथ्वी शॉनेही आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे. शुबमन गिलकडे बघा, जो त्याच्यासोबत अंडर-१९ क्रिकेट खेळला आणि आता भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळत आहे. पण शॉ अजूनही आयपीएलमध्ये संघर्ष करत आहे. ऋतुराज गायकवाडनेही आयपीएलच्या एका मोसमात ६०० धावा केल्या आहेत.”


आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ सलग दोन सामने हरला आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर संघाचे नेतृत्व करत आहे. पृथ्वी शॉने पहिल्या दोन सामन्यांत वॉर्नरसोबत डावाची सुरुवात केली. शॉ पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप ठरला आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शॉला मार्क वुडने १२ धावांवर बाद केले होते. त्यानंतर गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने त्याला ७ धावांवर बाद केले. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग शॉ ज्या प्रकारे आउट होत आहे, त्यावरून तो अजिबात खूश नाही.

Comments
Add Comment

ICC Mens Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये वैभवची मोठी झेप; गिल आणि ईशान किशानने फटकवले अव्वल स्थान

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी २९ जुलै रोजी पुरुषांची फलंदाजीची क्रमवारी जाहीर केली

Commonwealth Games 2026 : भारताची पदकांची कमाई सुरूच! हरजिंदर कौर आणि गुलवीर सिंहची रौप्य झेप; पदकसंख्या पोहोचली १२ वर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी कायम असून मंगळवारी भारतीय खेळाडूंनी आणखी दोन

Fast bowler Justin Greaves : जस्टिन ग्रीव्हसचा ऐतिहासिक पराक्रम, पण मराठमोळ्या बापू नाडकर्णींचा ६२ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम आजही अभेद्य!

मुंबई : वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जस्टिन ग्रीव्हस (Fast bowler Justin Greaves) याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी

Team India : टी दिलीप यांची अचानक एक्झिट; टीम इंडियात कोणाची झाली एन्ट्री?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) कोचिंग (Coaching) स्टाफमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. असिस्टंट (Assistant) कोच रेयान

World Chess Championship : गुकेश आणि सिंदारोव्ह यांच्यातील जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढत जिनिव्हामध्ये रंगणार

नवी दिल्ली : विद्यमान जागतिक विजेता गुकेश डी आणि आव्हानवीर जावोखिर सिंदारोव्ह यांच्यातील २०२६ ची जागतिक

ISSF World Cup : सोनम आणि हिमांशूला १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक

हाँगझोऊ : चीनमधील हाँगझोऊ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषकात भारतीय रायफल नेमबाज सोनम उत्तम मस्कर आणि