हा कुजका मेंदू कुणाचा?

फडणवीसांच्या टीकेवर राजकीय वर्तुळात खमंग चर्चा!


नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना 'तुमच्यासारख्या कुजक्या लोकांच्या मेंदूला सरळ केल्यानंतर सावरकरांना भारतरत्न मिळेल' असे म्हटल्याने हा कुजका मेंदू नेमका कुणाचा? यावरुन राजकीय वर्तुळात खमंग चर्चा होत आहे.


नागपूर येथे सावरकर गौरव यात्रेत बोलताना फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा खरपूस समाचार घेतला.


स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा यावरुन भाजपवर ठाकरे गटाकडून टीका करण्यात येते. या त्यांच्या मुद्द्यावरुन फडणवीसांनी त्यांना चांगलेच झापले. यांच्याकडे एकच मुद्दा आहे, तो म्हणजे सावरकरांना भारतरत्न द्या. सावरकर हे भारतरत्न आहेतच. सावरकरांना भारतरत्न मिळायचा तेव्हा मिळेलच. आज देशामध्ये अनेल लोक असे आहेत की ज्यांना भारतरत्न मिळालेला नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंना अजून भारतरत्न मिळालेला नाही. सावरकरांना भारतरत्न जरुर मिळेल पण तुमच्यासारख्या कुजक्या लोकांच्या मेंदूला सरळ केल्यानंतर सावरकरांना भारतरत्न मिळेल, अशा शब्दात फडणवीसांनी विरोधकांवर तोफ डागली.


त्यांच्या या टीकेनंतर 'कुजका मेंदू' अशी टीका त्यांनी नेमकी कुणावर केली यावर आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नेमकी ही टीका उद्धव ठाकरेंवर, संजय राऊतांवर, राहुल गांधींवर होती की आणखी कुणावर? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.


दरम्यान, यावेळी राहुल गांधींवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, 'राहुल गांधी म्हणाले की माफी मागायला मी सावरकर नाही. पण सावरकर होण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो. सावरकरांना ज्या छोट्याशा खोलीत डांबल होतं त्याच ठिकाणी राहुल गांधींना मी एसी लावून देतो त्यांनी एक रात्र राहुन दाखवावं', असे खुले आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिले आहे.

Comments
Add Comment

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे