नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा माजी कर्णधार आणि आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या हातावर नवा टॅटू चितारला आहे. आध्यात्माला जोडणारा हा टॅटू काढण्यासाठी आर्टिस्टला तब्बल १४ तास लागले. हा टॅटू चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे.
आपल्या खेळाबरोबरच विराट कोहलीने आपल्या शरीरावर गोंदलेल्या टॅटूमुळेही तो चाहत्यांची प्रशंसा मिळवून जातो. विराटच्या शरीरावरील टॅटूमध्ये आता भर पडली आहे. गेल्या महिन्यात विराटने आपल्या हातावर टॅटू काढला. हा टॅटू काढण्यासाटी आर्टिस्टला तब्बल १४ तास लागले. टॅटू काढणाऱ्या आर्टिस्टच्या मते, ‘हा टॅटू विराट कोहलीच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू दर्शवतो. विराट कोहलीच्या टॅटूला चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहत्यांना विराट कोहलीचा हा नवीन टॅटू आवडला आहे. सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरु आहे.
विराट कोहलीला आपल्या जुन्या टॅटूसोबत नवीन टॅटू जोडायचा होता. नवीन टॅटूमधून आध्यात्माची झलक दिसावी, अशी विराट कोहलीची इच्छा होती.