माद्रिद स्पेन मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धा
माद्रिद (वृत्तसंस्था) : माद्रिद स्पेन मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला जेतेपदाने हुलकावणी दिली. अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगने सिंधूचा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले.
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूला माद्रिद स्पेन मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात तुनजुंगने सिंधूला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.
पहिले दोन्ही गेम ८-२१, ८-२१ असे सहज जिंकला तुनजुंगने सामना खिशात घातला. तुनजुंगचा सिंधूविरुद्धचा हा पहिला विजय आहे. ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगने सिंधूचा पराभव करत तिचे पहिले वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावले.
तुनजुंगने उपांत्य फेरीत अव्वल मानांकित आणि माजी ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मारिनचा पराभव केला होता. दुसरीकडे सिंधूने उपांत्य फेरीत सिंगापूरच्या येओ जिया मिनचा २४-२२, २२-२० असा पराभव केला.