कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या ट्रस्टींमध्ये रस्त्यावरच फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून बाळूमामा ट्रस्टचा गैरकारभार आणि ट्रस्टी नेमणुकीवरून निर्माण झालेल्या वादंगाची चर्चा आहे. या वादातूनच दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, की श्री सद्गुरू संत बाळूमामा देवालय ट्रस्टची स्थापना २००३मध्ये झाली होती. यात एकूण १८ ट्रस्टी आहेत. यापैकी ६ ट्रस्टींचे निधन झाले असून गेल्याच महिन्यात कार्याध्यक्ष राजाराम मगदूम यांचे ही निधन झाले आहे. यामुळे सध्या ट्रस्टवर एकूण १२ ट्रस्टी राहिले आहेत.
ट्रस्टी नेमणूक आणि मंदिरामध्ये सुरू असलेल्या गैरकारभाराविरोधात आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. या संदर्भात त्यांच्या वकिलांना भेटायला आले असता त्यांच्या विरोधातील मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले त्याचे समर्थक आणि सरपंच विजय गुरव यांच्यामध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली.
भोसले गटाच्या समर्थकांनी सरपंच गुरव हे गावचं आणि ट्रस्टचं नाव बदनाम करत असल्याचा आरोप केलाय. तर देवस्थान समितीच्या ट्रस्टचा कारभार चुकीच्या पद्धतीने करून बेकायदेशीरपणे ट्रस्टीची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर कार्याध्यक्षांची नेमणूकही बेकायदेशीर झाली आहे, असा गंभीर आरोप सरपंच विजय गुरव यांनी केला आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…