धक्कादायक! चंद्रपुरात पतीकडून पत्नीची जिवंत जाळून हत्या; दरवाजाला कडी लावून फरार

चंद्रपूर : महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या २७ वर्षीय विवाहितेचा होरपळून मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


चंद्रपूर शहरातील महाकाली वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या गौतम नगर परिसरात राहणाऱ्या दीक्षा शुभम भडके या तरुण विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तिच्या पतीवर पत्नीला जिवंत जाळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, मृत्यूपूर्व जबाबातही पतीचेच नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शुभम भडके हा घरी आला. घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली त्यानंतर त्याने पत्नी दीक्षाला पेटवून दिले आणि घटनास्थळावरून फरार झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे.


आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला असता दीक्षा गंभीर अवस्थेत, पूर्णतः भाजलेली आढळून आली. तिला तातडीने चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच ७ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला.


या घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. चंद्रपूर शहर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला असून, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. घटनेमागील नेमके कारण काय, पतीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस तपासातून घेतला जात आहे.

Comments
Add Comment

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील