Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २ ते ८ एप्रिल २०२३

Share

साप्ताहिक (Horoscope) राशिभविष्य, रविवार दि. २ ते शनिवार ८ एप्रिल २०२३

मोठ्या संधी मिळतील
मेष – या आठवड्यात आपल्याला भावनेच्या आहारी न जाता कर्तव्याला प्राधान्य देणे हिताचे ठरेल. नोकरी आणि व्यवसायिक क्षेत्रात कामाची व्याप्ती वाढल्यामुळे जास्तीचे काम करावे लागण्याची शक्यता. कोणत्याही प्रकारचा ताण-तणाव न घेता आपले काम करण्याच्या प्रयत्नात कमी पडून देऊ नका. नोकरीतील राजकारण आणि गटबाजी यांपासून मनस्ताप होण्याची शक्यता. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. आपल्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. व्यवसायामध्ये अचानक उद्भवलेल्या काही समस्या व्यवसायावर परिणाम करू शकतात. चर्चेद्वारे समस्यांचे निवारण करता येईल.
अधिकारांमध्ये वृद्धी
वृषभ – सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये आपल्याला थोडा संयम बाळगावा लागणार आहे. आपल्या मनाप्रमाणे कार्य होतीलच असे नाही. लगेच नाराज होण्याची गरज नाही. आपले प्रयत्न चालू ठेवणे महत्त्वाचे ठरेल. खर्चामध्ये वाढ होईल; परंतु ते खर्च काही चांगल्या कामासाठी होणार आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळू शकते. काहींना शिष्यवृत्तीसह परदेशगमनाचे योग. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस घ्याल. सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वृद्धी होऊन सामाजिक स्तर उंचावेल. लोकसंग्रह वाढेल. आपल्या कार्याची प्रशंसा होईल. नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. आपल्या कार्यशैलीचे कौतुक होईल.
जुनी येणी वसूल होतील
मिथुन – व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून व्यवसायात केलेले नवीन बदल व्यवसायासाठी पोषक ठरतील. व्यवसाय विस्ताराच्या योजना सफल होतील. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील, मात्र उधार-उसनवारी टाळा. त्याचप्रमाणे जुगारसदृश व्यवहार करू नका. जास्त प्रमाणात जोखीम असलेली कार्य टाळणे हितकारक ठरेल. सरकारी कामांमध्ये कटकटी निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे विलंब लागून खर्चही होण्याची शक्यता आहे. वाहने सावधानतेने चालवा. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. दीर्घकालीन रखडलेले मालमत्तेचे व्यवहार गतिशील होतील.
शांतपणे निर्णय घेणे गरजेचे
कर्क –कोणतेही लहान-मोठे व्यवहार करताना सावधानता बाळगणे गरजेचे ठरेल. त्याचप्रमाणे नव्या गुंतवणुका करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला उपयोगी पडू शकतो. फसवणुकीची शक्यता अथवा नुकसान. शांतपणे निर्णय घेणे गरजेचे. घाईगर्दीत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात. याची जाण ठेवा. व्यवसाय-धंद्यात वातावरण जरी सर्वसामान्य असले तरी अचानक काही समस्या उद्भवू शकतात. विशेषतः भागीदारी व्यवसायात भागीदाराबरोबर वाद-विवाद घडून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. भागीदाराच्या मतास उचित प्राधान्य देणे हिताचे ठरेल. स्वतंत्र व्यवसायात सर्वसामान्य परिस्थिती राहील. कोर्ट प्रकरणे पुढे ढकला.
महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील
सिंह – अनुकूल असे ग्रहमान आपल्याला चांगली फळे देईल. खासगी अथवा सरकारी नोकरीमध्ये पती अथवा पत्नीचा भाग्योदय. पूर्वी केलेल्या कामाचे अपेक्षित फळ मिळेल. पदोन्नती अथवा वेतन वृद्धीसारख्या घटना घडू शकतात, मात्र बदलीची शक्यता आहे. कामाच्या स्वरूपात बदल होऊन स्थानांतर होऊ शकते. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवणे क्रमप्राप्त ठरेल. सामाजिक मानसन्मान मिळून एखाद्या कार्यक्रमात मानाचे स्थान मिळेल. समाजातील प्रभावशाली व्यक्तींच्या मार्गदर्शनासह मदत मिळू शकते.
आरोग्याकडे लक्ष ठेवा
कन्या – शांतपणे तसेच पूर्ण विचारांती निर्णय घेणे गरजेचे ठरेल. घरातील मुला-मुलींचे प्रश्न सुटतील; परंतु लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. वैवाहिक जीवनात सुवार्ता मिळतील. सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग आहेत. प्रवासकार्य सिद्ध राहतील. कुटुंबातील वातावरण उत्साही राहील. नोकरीतील परिस्थिती सर्वसामान्य राहील; परंतु आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. तसेच गटबाजी, राजकारणापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांची मर्जी टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
फायद्यात राहाल
तूळ –सध्याचा कालावधी यशदायी ठरेल. हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात मनाप्रमाणे यश मिळणार आहे. मात्र आपल्या कार्यक्षेत्रात आपण सकारात्मक राहणे गरजेचे ठरेल. इतरांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून त्यावर प्रतिक्रिया द्या, फायद्यात राहाल. शत्रू, हितशत्रू अथवा विरोधक यांच्या कारवाया वाढल्या तरीi8 त्यांच्यावर विजय प्राप्त करू शकाल. कुटुंब, परिवार तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळातील मतभेदांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने मनस्ताप होणार नाही. लहान-सहान गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. तरुण-तरुणींचे प्रश्न संपतील. प्रेमात यश मिळू शकते.
उद्दिष्टे पूर्ण होतील
वृश्चिक – आपल्या कार्यक्षेत्रात केलेले नियोजन सफल होताना अनुभवता येईल. केलेल्या कष्टाचे फळ मिळू शकेल. मात्र सरकारी प्रकरणातून त्रास संभवतो. सरकारी नियम पाळा. तसेच सरकारी स्वरूपाच्या कामात विलंब लागू शकतो तसाच खर्च येऊ शकतो. शांत डोक्याने आपल्या पुढील कार्य करत राहा. सामाजिक जीवनात शत्रू व हितशत्रूंपासून मन:स्तापाची शक्यता आपल्या कार्यक्षेत्रात तसेच कुटुंब परिवारात व मित्रमंडळींच्या वर्तुळ वाद-विवाद करणे टाळा. व्यावसायिक येणी वसूल होतील. मात्र वसुली करताना तडजोड स्वीकारा. कलहसदृश प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. गोड बोलून कार्यभाग साधा.
प्रलोभनांपासून अलिप्त राहा
धनु – आपल्या कार्यक्षेत्रात अथवा कुटुंब परिवारामध्ये असलेल्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. खर्चाच्या प्रमाणातही वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल. स्वतःसाठी खर्च कराल. राहत्या घराविषयी चे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नरत राहाल. स्वतःचे मालकीचे घर असावे या स्वप्नपूर्तीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. पैशाची सोय होईल. कर्ज मंजूर होईल. व्यवसाय-धंद्याचा कार्यविस्तार वाढल्याने काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. उलाढाल वाढेल. नोकरीमध्ये अनपेक्षित बढती मिळू शकते पण काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागण्याची शक्यता आहे.
प्रशंसा होईल
मकर – सावध राहून कार्य पूर्ण करा. एकाच वेळेस अनेक कामे करण्याचा प्रयत्न अंगाशी येऊ शकतो. वाहने सावकाश चालवा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची गरज. नुकसानीची शक्यता. महत्त्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तू, वाहने सुरक्षित ठेवणे गरजेचे ठरेल. चोरीची अथवा गहाळ होण्याची शक्यता. जुने वाहन बदलून नवीन वाहन खरेदी करता येईल. कुटुंब-परिवारात लहान-सहान कारणांवरून वाद-विवाद संभवतात. कुटुंबातील सदस्यांबरोबर समन्वय साधने गरजेचे ठरेल. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. व्यवसायातील खर्चामध्ये वाढ होऊ शकते कामगारविषयक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता.
नियोजनाला महत्त्व राहील
कुंभ – एखाद्या अप्रिय घटनेचा परिणाम कार्यतत्परते वरती होणार नाही याची काळजी घ्या. नाराज होऊ नका. मनस्वास्थ्य सांभाळा. छोट्याशा कामाला जास्त वेळ लागला तरी विचलित होऊ नका. खर्चाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता. कार्यक्षेत्रात मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे; परंतु आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून कार्यमग्न राहणे गरजेचे ठरेल. सर्वत्र नियोजनाला महत्त्व राहील. नियोजनाला प्राधान्य दिल्यास येणाऱ्या समस्या टाळता येतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचा विश्वास तसेच त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.
कार्यमग्न राहा
मीन –अचानक काही खर्च समोर उभे राहिल्याने नियोजनात बदल करावे लागतील. खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे दिसेल. व्यवसाय-धंद्यात आर्थिक मदतीची गरज भासू शकते. कर्जप्रकरणे मंजूर होतील. मित्रमंडळींच्या वर्तुळातून अथवा ओळखीतून ही आर्थिक मदत मिळू शकते. कुटुंब- परिवारातून ज्येष्ठ व्यक्तींकडून सहाय्य मिळेल. चिंतामुक्त राहाल. समस्या जरी आल्या तरी त्या सुटतील. प्रयत्नशील राहून कार्यमग्न राहा. कुटुंबामध्ये धार्मिक अथवा मांगलिक कार्य घडण्याची शक्यता. एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन होईल. नोकरीमध्ये पती अथवा पत्नीचा भाग्योदय होऊ शकतो. अचानक पदोन्नती अथवा वेतनवृद्धी मिळेल.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

9 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

41 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

10 hours ago