Friday, March 21, 2025
Homeब्रेकिंग न्यूजछत्रपती संभाजीनगरमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स, पोलीस बंदोबस्त आणखी कडक

छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स, पोलीस बंदोबस्त आणखी कडक

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी मध्यरात्री किराडपुरा भागात झालेल्या दंगलीनंतर आता शहरात मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच शहरात ३ रॅपिड  ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच आज यातील एका ५१ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

या राड्यात १४ पोलीसही जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. त्यानंतर जिन्सी पोलिसात या प्रकरणी ४०० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले असून, ६ जणांना अटक करण्यात आले आहेत.

सध्या शहरात ७ पोलिस अधीक्षक व पोलिस उपायुक्त, ५ सहायक पोलिस आयुक्त, २८ पोलीस निरीक्षक, ५२ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक तसेच राज्य राखीव दलाच्या १२०० जवानांसह, ३ रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून आठ पथक तैनात करण्यात आले आहेत. सोबतच घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

बुधवारी रात्री शहरातील किराडपुरा परिसरात रामनवमीच्या उत्सवादरम्यान दोन गटात वाद झाला होता. या वादानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर एक मोठा जमाव झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवर दगडफेक केली. तसेच पोलिसांच्या वाहने पेटवून दिली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -