संजय राऊत यांचे वक्तव्य वाह्यात! त्यांच्यावरच दंगलीचा गु्न्हा दाखल करा, बावनकुळेंचा हल्लाबोल

नागपूर: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे वक्तव्य वाह्यात असून त्यांच्या या वक्तव्याने जर पुन्हा दंगली झाल्या तर राऊतांवरच दंगलीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या छत्रपती संभाजीनगरातील दंगल प्रकरणावरुन केलेल्या भडकावू वक्तव्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला आहे.


छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या दंगली झाल्या त्या सरकार पुरस्कृत होत्या, असा आरोप संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. तसेच महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठीच हे कटकारस्थान रचल्याचे त्यांनी म्हटले आहे.


या वक्तव्यावरुन राऊतांवर निशाणा साधत बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत यांनी असे बोलणे म्हणजे पु्न्हा एकदा चिथावणी देण्यासारखे आहे. यापूर्वी देखील राज्यात दंगली घडल्या. मात्र, आम्ही विरोधी पक्षात असूनही राऊतांसासरखे वाह्यात वक्तव्य केले नाही.


ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीने त्यांची सभा घ्यावी, आम्ही देखील वीर सावरकर यात्रा काढणार आहोत. मात्र, संजय राऊत यांनी जर भडकाऊ भाषण केले तर महाविकास आघाडीची सभा कशी होईल मला माहिती नाही. त्या ठिकाणी संजय राऊत आणि चंद्रकांत खैरै यांच्यामुळे वातावरण बिघडू शकते, असे म्हणत सामाजिक सलोखा निर्माण करत महाविकास आघाडीने सभा घ्यावी, असेही त्यांनी सुचविले.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या