आंध्र प्रदेश (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरी येथील वेणुगोपाल स्वामी मंदिराला रामनवमी उत्सवादरम्यान भीषण आग लागली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
मंदिर परिसरात रामनवमीसाठी तयार करण्यात आलेल्या पंडालमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याचे समजते. दरम्यान, स्थानिक पोलीस आणि मंदिराच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य केले. तसेच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र, काही लोक किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. आगीत किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले नाही.