'बॅनर उद्धवजींचा, धूर राष्ट्रवादीतून'

शीतल म्हात्रे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात ट्विटरवर कलगीतुरा!


मुंबई : राज्यात इतर मुद्द्यांवरून राजकारण तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेमधील शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यात मात्र वेगळेच ट्विटर वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे.


काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या एका व्हिडीओवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या व्हिडीओवरून गंभीर आरोपही करण्यात आले. यावरून तापलेले राजकारण शमले असतानाच आता शीतल म्हात्रे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात पुन्हा ‘ट्विटर वॉर’ सुरू झाल्याचे दिसत आहे. रविवारी संध्याकाळपासून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.


शीतल म्हात्रेंनी २५ मार्च रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास उद्धव ठाकरे गटाच्या बॅनरचा एक फोटो ट्वीट केला होता. हा बॅनर उर्दू भाषेत छापला होता. “या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं होतं. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्ववादी विचारधारा? उध्वस्त सेना.. खांग्रेसची चमचेगिरी”, असे ट्वीट शीतल म्हात्रेंनी केले होते.





उद्धव ठाकरेंच्या मालेगाव सभेसंदर्भातला हा उद्धव यांना डिवचणारा बॅनर होता. ते राहिले बाजुला आणि कायम वाद स्वत:च्या अंगावर ओढवून घेणारे जितेंद्र आव्हाड यांनी शीतल म्हात्रेंना प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे गटाचा एक बॅनर ट्वीट केला. हा बॅनरही उर्दू भाषेत असून त्यावर एकनाथ शिदेंसह अब्दुल सत्तार यांचाही फोटो आहे. “याच्यावर बोला ताई. खास तुमच्या माहितीसाठी. कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे”, असे ट्वीट आव्हाडांनी केले.




या ट्वीटवर पुन्हा शीतल म्हात्रेंनी प्रत्युत्तर दिले. “मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना ट्वीट चांगलंच झोंबलेलं दिसतंय. पण मला एक समजत नाही, मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय”, असे ट्वीट शीतल म्हात्रेंनी केले.


त्यावर प्रत्युत्तरादाखल आव्हाडांनी केलेल्या ट्वीटमध्ये “मला काम करताना गवगवा करण्याची सवय नाही. लोकांसाठी कार्यक्रम करतो. माझ्या मतदारसंघात येऊन विचारा. उघड्यावर लाज घालवणारं कृत्य मी करत नाही. आठवतंय ना? काय दे ढुं**, काय तो दांडा.. धूर कुठून निघाला?” असा खोचक सवाल करण्यात आला.


दरम्यान, यावर पुन्हा एकदा शीतल म्हात्रे यांनी एक ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर दिले. “पवारांची भाकरी आणि उद्धवजींची चाकरी. लगे रहो भाईजान”, असे म्हात्रेंनी म्हटल्यानंतर त्यावर “त्याची चिंता आपल्याला नसावी. उगाचच बोलायला लावू नका. घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी”, असे खोचक ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Comments
Add Comment

RTE अंतर्गत आले दोन लाख ८८ हजार अर्ज

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील दोन लाख ८८ हजारांहून

Rejuvenation of rivers : राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना

मुंबई : राज्यातील नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि नद्यांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्य

आर्थिक वर्षाच्या अखेरीस मंत्रालयात 'जीआर'चा पाऊस

चार दिवसांत ९५१ निर्णयांचा धडाका; सुट्ट्यांच्या दिवशीही प्रशासन 'ऑन ड्युटी' मुंबई : आर्थिक वर्षाच्या अखेरीस

Land surveyors : भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती

मुंबई : राज्यातील भूकरमापकांना आता वाढीव वेतनश्रेणीसह पदोन्नती मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Navsari : नवसारी येथे असलेल्या उभारणार भव्य क्रीडा संकुल

मुंबई : अमरावती शहरातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज

जैन धर्म हा हिंदू संस्कृतीचाच भाग, अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ - कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा

मुघल, इंग्रज आणि तत्कालीन काँग्रेसच्या फोडा आणि राज्य करा नीतीमुळेच हिंदू विभागले : मंत्री लोढा यांचा