मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात माहीम भागात अनधिकृत बांधकाम झाल्याचे म्हटले होते. तसेच एक महिन्यात बांधकाम हटवले नाहीतर त्याठिकाणी गणपती मंदिर बांधू असा इशाराही त्यांनी दिला होता. यानुसार रातोरात चक्रे हलली आणि पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने हे बांधकाम निष्कासित केले. जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. पोलीस बंदोबस्तामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली.
प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे गेल्या २ वर्षात समुद्रात कथित मजार उभारण्यात आली. माहीम दर्गाच्या मागे काही वर्षांपासून समुद्रात नवीन हाजीअली तयार करण्याचे काम सुरू होते, असा आरोप राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत केला होता.
हे प्रकरण संवेदनशील असल्याने कारवाईवेळीची कोणतीही दृष्य दाखवण्यात आलेली नाहीत. आता माहीम समुद्र किनाऱ्यावरील पोलीस बंदोबस्तामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, तोडकाम पूर्ण झाल्याचं मनसे नेत्यांना प्रशासनाकडून कळवण्यात आले. प्रशासनाने ही तातडीने दखल घेतल्याबाबत मनसेने प्रशासनाचे कौतुक केले आहे. त्याचसोबत इतर ठिकाणीही अशी बांधकामे होत असतील तर त्याठिकाणी कारवाई व्हावी. तसेच त्या जागेवर पुन्हा असे बांधकाम होणार नाही याची दक्षता प्रशासनासोबत स्थानिकांनीही घ्यावी. यापुढे असे होऊ नये हे सगळ्यांनीच पाहिले पाहिजे, असे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे.
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…
मच्छिमारांच्या घरांसाठी केंद्राने भूमिका घ्यावी - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोलाचा सल्ला मुंबई : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे,…
पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…