Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीकधीही न बऱ्या होणाऱ्या गंभीर आजारामुळे 'ही' अभिनेत्री काळोखात

कधीही न बऱ्या होणाऱ्या गंभीर आजारामुळे ‘ही’ अभिनेत्री काळोखात

मुंबई: मालिकाविश्वातून गायब झालेल्या अभिनेत्रींचं पुढं काय होतं याची सहसा माहिती मिळत नाही. अनेकदा या अभिनेत्री लाईमलाईटपासून दूर जात काळोखात दिसेनाश्या होतात. अशीच एक एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री सध्या एका आजाराशी झुंज देतेय. ही कोण अभिनेत्री आहे. तिचा आजार काय आहे जाणून घेऊ.

झी टीव्हीवरील ‘अगले जनम मोहें बिटियाही कीजो’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रतन राजपूत घराघरात पोहोचली होती. या मालिकेत रतनने ‘लाली’ ही भूमिका साकारली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. मालिकेतील रतनची भूमिका आणि तिचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडला होता. मुख्य अभिनेत्री म्हणून आपल्या या पहिल्याच मालिकेत रतनचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. त्यानंतर ती आणखी काही मालिका, बिग बॉस व नंतर युट्यूब चॅनलनवरुनही प्रेक्षकांच्या भेटीला आली. पण तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिला एक गंभीर आजार झाला. कधीही बरा न होणाऱ्या आजाराशी ती आजतगायत लढतेय.

रतनच्या डोळ्यांना ऑटो इम्यून सिस्टम हा आजार झाला आहे. यामध्ये स्टेरॉईड देण्यात येतात. यामुळे तिला प्रकाशात असताना त्रास होतो. यामुळे तिच्यासाठी जगणं खूप अवघड झालं. तसेच ती कायम गंभीर आजारी राहू लागली. एक दिवस रतनने विचार केला की जोपर्यंत ती जोपर्यंत डोळ्यांनी पाहू शकते तोपर्यंत ती हे आयुष्य अगदी आनंदाने एन्जॉय करावं.

तेव्हापासून ती प्रवास करायला लागली आणि जग फिरण्यास सुरुवात केली. यामुळे तिची दृष्टी थोडी चांगली झाली आहे. आता ती सूर्यप्रकाशाचा सामना करु शकतो. तसेच तिने मध्यंतरी शूटिंग देखील केले आहे. रतन गेल्या चार पाच वर्षांपासून या आजाराचा सामना करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -