नवी मुंबई (वृत्तसंस्था) : अॅमेलिया केरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मंगळवारी मुंबई इंडियन्सने रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघावर ४ विकेट राखून रॉयल विजय मिळवला. महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा हा सहावा विजय आहे.
आरसीबीने दिलेले १२६ धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईने दमदार सुरुवात केली. हायली मॅथ्यूज (२४ धावा) आणि यश्तिका भाटीया (३० धावा) यांनी ५३ धावांची सलामी करत मुंबईला विजयाच्या वाटेवर नेऊन ठेवले. त्यानंतर हरमनप्रीत कौर, नॅट स्कीवर ब्रंट या झटपट बाद झाल्यामुळे आरसीबीने सामन्यात पुनरागमन केले. अॅमेलिया केरने नाबाद ३१ धावा तडकावत मुंबईचा विजय निश्चित केला. तिला पूजा वस्त्रकारने १९ धावांची साथ दिली. मुंबईने १६.३ षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले.
तत्पूर्वी सामन्यात टॉस जिंकून मुंबई संघाने प्रथम गोलंदाजी करत आरसीबीला १२५ धावांवर रोखले. अगदी पहिल्या षटकापासून मुंबईने भेदक गोलंदाजी केली. अवघ्या एका धावेवर बंगळुरुची पहिली विकेट पडली. त्यानंतर स्मृती मन्धाना आणि एलिस पेरीने काहीस डाव सावरला. स्मृतीने २४ धावा, तर एलिसा पेरीने २९ धावा केल्या. रिचा घोषने खालच्या फळीत २९ धावा फटकावत बंगळुरुला कसेबसे १२५ धावांपर्यंत पोहचवले. अॅमेलिया केरने सर्वाधिक ३, तर इस्सी वोंग आणि नॅट ब्रंटने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर साईका इशाकने एक विकेट घेतली.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…