मुंबई : राज्यातला कोरोनाचा प्रभाव ओसरताच आता H3N2 ची नवी भीती निर्माण झाली आहे. यामुळे सध्या राज्यामध्ये २ मृत्यू झाले आहेत. त्याबद्दल बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
आरोग्यमंत्री सावंत यांनी नागरिकांना ताप अंगावर न काढण्याची सूचना दिली आहे. तसेच राज्यातल्या रुग्णांच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे. सावंत म्हणाले, “१२ मार्चला राज्यात ३५२ रुग्ण आहेत. परीक्षा संपल्यावर मित्रांसोबत फिरायला आलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते, रात्री १२ वाजता त्याचा मृत्यू झाला. नागपूरमधल्या एका इसमाचाही मृत्यू झाला आहे. H3N2 ने त्वरीत मृत्यू होत नाही, उपचार घेतला तर तो रुग्ण बरा होतो.”
राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे हे सांगताना तानाजी सावंत म्हणाले, “सर्व रुग्णालयांमध्ये आम्ही याबद्दल अलर्ट दिला आहे. अशा आजाराचा रुग्ण असेल तर त्याच्यावर उपचार करण्याचे निर्देश दिलेले आहेत. नागरिकांना सूचना आहे, जर ताप आला असेल, तर अंगावर काढू नका. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.”
खोकला
अस्वस्थ वाटणं
उलट्या होणं
घशात खवखव
अंगदुखी
बद्धकोष्ठता
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…