ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज शेख यांना चैत्र चाहूलचा 'रंगकर्मी सन्मान'

'चतुरंग'चे विद्याधर निमकर यांना 'ध्याससन्मान' पुरस्कार


मुंबई: 'चैत्रचाहूल' या २२ मार्च रोजी होणाऱ्या मराठी नववर्षाच्या स्वागत सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज शेख यांना चैत्र चाहूलचा 'रंगकर्मी सन्मान' आणि 'चतुरंग'चे विद्याधर निमकर यांना 'ध्याससन्मान' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.


बुधवारी सकाळी १०.३० वा. दादर येथील शिवाजी नाट्य मंदीर येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. अ‍ॅड फिझ आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या सोहळ्याचं हे सोळावं वर्ष आहे. मराठी नववर्षाच्या शुभेच्छा मराठी संस्कृतीचा जागर करून देणे हे या सोहळ्यामागील उद्दिष्ट आहे. यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे यात मराठी संस्कृतीच्या जागरासोबत सामाजिक भानही राखण्यात आले आहे. यासाठीच सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या या दोन थोर व्यक्तिमत्वांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक महेंद्र पवार यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

मुंबई: आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव येथील

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री

Ritu Tawde : मिठी नदीतील गॅस साठा म्हणजे 'भ्रष्टाचाराचा कचरा'; रितू तावडे यांचा 'पेंग्विन सेने'वर घणाघाती प्रहार!

मुंबई : भाजप नेत्या आणि महापौर रितू तावडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक आक्रमक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे

गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकारची नियमावली

अत्यावश्यक सेवांना प्राधान्य; साठा मुबलक, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुंबई : इराण आणि इस्राईल दरम्यान