Share

साप्ताहिक (Horoscope) राशिभविष्य, दि. १२ ते १८ मार्च २०२३

परीक्षेत यश मिळेल
मेष – नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा कालावधी चांगला आहे. या कालावधीमध्ये आपणास नवीन मित्र आणि नाती जोडली जातील. या कालावधीमध्ये आपला उत्साह चांगला असणार आहे. आपणाला आपले मित्र आणि सहकारी यांचे सहाय्य मिळणार आहे. तुमच्या विचाराबाबत स्वतःला आत्मविश्वास असणार आहे. अचानक प्रवासही संभवतो. प्रवास फलदायी होतील. जागा किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार करू नका. परीक्षेत यश. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडणार आहे. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. नवीन कामे फायदेशीर ठरतील.
कार्यामध्ये निश्चित यश
वृषभ – या कालावधीमध्ये आपल्या चांगल्या कामाची सुरुवात होऊ शकते. तुमच्या हातून काही चांगले कार्य घडण्याची शक्यता आहे. तुम्ही अत्यंत आनंदी असणार अाहात. कौटुंबिक सौख्य लाभणार आहे. तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नात वाढ होणार आहे. तुमच्या छंदासाठी तुमचे मित्र व सहकारी मदत करतील. आर्थिक लाभ मिळण्यासाठी हा चांगला कालावधी आहे. काही अनपेक्षित चांगल्या घटना घडून येतील. महिला आणि वरिष्ठ व्यक्तींकडून लाभ होण्याची शक्यता आहे. तुमची कष्ट करायची तयारी असल्यामुळे तुम्हाला कार्यामध्ये निश्चित यश मिळणार आहे. तुम्हाला नवीन संधी मिळतील.
प्रवास संभवतात
मिथुन – आपणाला भरपूर नवीन-नवीन संधी येण्याची शक्यता आहे. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. धावपळ आणि दगदग होऊन स्वतःची प्रकृती बिघडू शकते. दूरचे प्रवास संभवतात, प्रवास टाळलेलेच चांगले. जवळच्या व्यक्तींशी वाद-विवाद होण्याची शक्यता किंवा विरह होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. पण खर्चही तेवढेच वाढणार आहेत. हा कालावधी मिश्र घटनांचा राहणार आहे. काही प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांना आकर्षित करून घेऊ शकाल, त्यातून फायदे होतील. नवीन योजना कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
लवचिक धोरण स्वीकारा
कर्क –तुमच्या कामाच्या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आणि कामाच्या दबावामुळे कारकिर्दीमध्ये काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्ही थोडे लवचिक धोरण अवलंबण्याची गरज आहे. नवीन प्रकल्प आणि करिअरमध्ये जास्त धोके पत्करू नका. तुम्ही तुमच्या नशिबावर फार विसंबून राहू नका. जास्त घाई करून उपयोग होणार नाही. तुम्ही तुमच्या कामाला कला समजून कार्य केल्यास आपण नवीन कल्पना राबवू शकता. चांगले संबंध आणि संवाद यातून तुम्हाला नव्या संधी मिळू शकतात. तुमच्या कामाचा अधिक विस्तार होऊ शकतो.
समृद्धीचा कालावधी
सिंह – धार्मिक कार्याकडे तुमचा ओढा असणार आहे. तुम्हाला धार्मिक प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कामामध्ये सातत्य ठेवल्याने आणि उत्साहाने काम केल्यामुळे आपल्याला समृद्धीचा कालावधी अनुभवयास मिळणार आहे. याचा पूर्णपणे आपण फायदा घ्या. चांगले प्रयत्न आपल्या हातून होणार आहेत. तुम्हाला तुमच्या तणावापासून आणि अडचणींपासून दिलासा मिळू शकतो. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून चांगले संबंध ठेवल्यास सहकार्य मिळणार आहे.
सतर्क राहा
कन्या – या कालावधीमध्ये आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या मोहात अडकू नका. संयम बाळगणे अतिशय महत्त्वाचे ठरेल. कुटुंबामधून जीवन साथीची साथ चांगली राहील. काहींना प्रवासाचा योग येईल. लहान-मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक ठरेल. व्यवसाय-धंद्यात कामगारांचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण त्यातून मार्ग निघेल. सकारात्मक विचार ठेवा. आर्थिक परिस्थिती ठीक-ठाक राहील. योग्य जाणकार आणि हितचिंतक यांच्याशी आवर्जून चर्चा करा.

अनुकूल घटना घडतील
तूळ –या आठवड्यात आपल्याला भाग्याची साथ मिळेल. अनुकूल घटना घडतील. बरेच दिवस एखादे रेंगाळलेले काम पूर्ण झाल्यामुळे आनंद आणि उत्साह वाढेल. दगदग कमी होईल. कष्टाचे चीज होईल. काहींना प्रवास योग आहे. प्रवास कार्य सिद्ध ठरतील; परंतु खर्चात वाढ होईल. नोकरीत प्रगती होईल. बदलीची शक्यता आहे. काही प्रश्नांची उत्तरे मिळतील. आर्थिक लाभ होतील. आपल्या कार्यशैलीमुळे इतरांवर प्रभाव पडेल. गृहसौख्य चांगले राहील. कुटुंबामधून सर्वांचे अपेक्षित असलेले सहकार्य मिळू शकते. मात्र आपण वाद-विवाद करू नका. धार्मिकतेमध्ये मन रमेल.
रागावर नियंत्रण आवश्यक
वृश्चिक – आठवड्याच्या सुरुवातीला नियोजित कामांमध्ये अडथळे उद्भवण्याची शक्यता आहे तसेच कामे अर्धवट राहतील. प्रयत्न जास्त करावे लागल्यामुळे आपल्या स्वभावात चिडखोरपणा येण्याची शक्यता आहे; परंतु आपल्या रागावर नियंत्रण आवश्यक राहील. कोणतेही लहान-मोठे निर्णय घेताना शांत राहणे आवश्यक आहे. पूर्ण विचारांती निर्णय घ्या. उत्तरार्धात कामे मार्गी लागतील. रुक्षपणा दूर होईल. समस्यांवर मात करू शकाल. अनेक अडचणी दूर होऊन भाग्याची साथ राहील. नोकरीत कामाचे स्वरूप बदलू शकते तसेच स्थान बदलाची शक्यता. जबाबदाऱ्या वाढू शकतात.
खरेदी विक्रीतून लाभ
धनु – सदरील कालावधीमध्ये आपल्या भौतिक सुखसुविधांमध्ये वृद्धी होईल. त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठा, यश आणि कीर्ती वाढेल. राहत्या घरासाठीच्या सुशोभीकरणासाठी खर्च होईल. व्यवसाय-धंद्यात मोठे करार-मदार होऊन काही फायद्याचे सौदे हाती येण्याची शक्यता. व्यवसायिक उलाढाल वाढेल. जमीन-जुमला स्थायी संपत्ती इत्यादींच्या खरेदी विक्रीतून लाभ मात्र वादविवाद टाळा. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळू शकतो. रखडलेले व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाच्या मार्गावर येतील. ओळखी, मध्यस्थी फलद्रूप होऊ शकतात. कुटुंब परिवारामध्ये लग्नकार्य ठरतील.
कामाची व्याप्ती वाढेल
मकर – या सप्ताहात आपण क्रोधावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या हट्टीपणाला नियंत्रणात ठेवा. घर आणि बाहेर शब्द जपून वापरा. कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नका. इतरांच्या म्हणण्याला अथवा मताला उचित प्राधान्य देणे हितकारक ठरेल. कोणालाही दुखवू नका. जोडीदाराचे आपल्याला उत्तम साथ मिळेल. महत्त्वाच्या कामांमध्ये काही वेळी अडचणी संभवतात, त्यावेळेस संयम ठेवून प्रयत्न केल्यास अडचणींवर मात करू शकाल. व्यवसाय-धंद्यामध्ये आयत्या वेळेस नियोजनात बदल करावे लागतील. कामाची व्याप्ती वाढेल तसेच अचानक काही समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
धार्मिक कार्यामध्ये मन रमेल
कुंभ – आपल्या कार्यक्षेत्रात पूर्वी आलेला ताणतणाव नाहीसा झाल्यामुळे स्वतः निवांत राहाल. धार्मिक कार्यामध्ये मन रमेल. नोकरीमध्ये राजकारण व गटबाजीपासून झालेला त्रास संपुष्टात येईल. आपली प्रतिक्रिया आपण एकदम देण्याचे टाळा. कुटुंबातील मुला-मुलींना चांगले शैक्षणिक यश मिळाल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. आरोग्य चांगले राहील. आत्मविश्वासात वाढ झाल्यामुळे आपल्या समोरील कामे आपण वेगाने करू शकाल. जीवनसाथीबरोबर गैरसमज करून घेऊ नका. तरुण-तरुणींना प्रेमामध्ये यश लाभेल. मात्र संशयाचे वातावरण राहू शकते.
वास्तू-वाहन योग
मीन –सदरील आठवडा अनेक गोष्टीत अविस्मरणीय ठरू शकतो. अनुकूल घटना घडतील. बरेच दिवस आपल्या मनात राहिलेली एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरदारांना नोकरीमध्ये दिलासा देणाऱ्या घटना घडू शकतात. पदोन्नती, वेतनवृद्धीसारख्या घटना घडतील. मात्र नवीन जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. कामाच्या स्वरूपामध्ये बदल संभवतो. बरेच दिवस मनात राहिलेले स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. केलेले प्रयत्न सफल होतील तसेच आपले जुने वाहन बदलून नवीन वाहन खरेदी करू शकाल.
या सप्ताहात आपली आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

2 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

3 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

3 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

3 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

4 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

4 hours ago