‘कन्यादान’ मध्ये आत्याबाई निर्मिती सावंतची एन्ट्री


  • ऐकलंत का!: दीपक परब


'कन्यादान' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अविनाश नारकर, उमा सरदेशमुख, संग्राम साळवी, अनिशा सबनीस, अमृता बने, प्रज्ञा चवंडे हे कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. ही मालिका रंजक वळणावर आली असून या मालिकेत आता निर्मिती सावंतची एन्ट्री होणार असून ती वंदू आत्याच्या भूमिकेत दिसणार आहे.


विनोदाची महाराणी अशी ओळख असणारी अभिनेत्री निर्मिती सावंत ‘वंदू आत्या’ची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. महाले कुटुंबातील अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व असणारी आत्या ‘चांगल्यासोबत चांगली आणि वाईट असणाऱ्यांसोबत तेवढीच वाईट’ अशा स्वभावाची आहे. मात्र आशालता आणि तिच्या तीनही मुलांसाठी आत्या ही नावडती व्यक्ती आहे. महाले कुटुंबातील सर्व रहस्य आणि आशालताच्या कारस्थानी युक्त्यांविषयी वंदू आत्याला सगळं काही माहीत आहे. त्यामुळे आशालतावरही आत्याचा कायम दबाव राहिला असून आशालताने आपल्या तिन्ही मुलांना नेहमीच आत्याविषयी वाईट सांगून त्यांना तिच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.


आता अनेक वर्षांनंतर आत्या महालेंच्या घरी येणार आहे. त्यावेळी तिच्या स्वभावातील विविध पैलू महाले कुटुंबीयांना अनुभवयाला मिळणार आहेत. शिवाय, आजवर ज्या आशालतामुळे या तीनही मुलांना आत्याविषयी राग आहे त्यांनाही आत्याच्या स्वभावातील प्रेमळपणाची जाणीव होणार आहे. अनेक वर्षांनंतर महालेंच्या घरी येणारी वंदू आत्या, आता तिच्या स्वभावातील सकारात्मकता आणि प्रेम त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवणार हे पाहायला प्रेक्षकांना मजा येणार आहे. महालेंच्या घरातील गुपितं फोडण्यासाठी येणारी वंदू आत्या भरपूर मजा-मस्ती, आनंद आणि प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा परिपूर्ण खजिना घेऊन येणार आहे.

Comments
Add Comment

लवकरच 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार बॉर्डर २ सिनेमा

सिनेमागृहात आपली दमदार छाप पाडल्यानंतर आता लवकरच बॉर्डर 2 हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. १९९७

भूमी पेडणेकरचा मराठमोळा लुक व्हायरल, पैठणी आणि चंद्रकोरनं चाहते घायाळ

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री भूमी पेडणेकरने नुकताच सोशल मिडियावर तिच्या मराठमोकळ्या लुकचे काही फोटो शेअर केले

Sharukh Khan : शाहरुखचा मन्नत बंगला लवकरच दिसणार नव्या स्वरुपात, सीआरझेडकडून मिळाला मोठा दिलासा

अभिनेता शाहरुख खानचा मन्नत बंगला हा जगप्रसिद्ध असून हा बंगला पाहण्यासाठी अनेकजण उत्सुकतेनं येतात. मात्र, गेल्या

Dhurandhar : रि-रिलीजच्या सिरीजमध्ये रणवीरच्या धुरंधरची एन्ट्री; या दिवशी होणार रिलीज

रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची अजूनही फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ असून लवकरच धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला

युद्धामुळे अडकलेली लारा दत्ता मुलीसह भारतात परतली; सांगितला थरारक अनुभव

मुंबई : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत त्या काळात लारा

हास्यजत्रा फेम इशा डे हिचा नवरा आहे तरी कोण? वाचा सविस्तर

मुंबई : लोकप्रिय कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री इशा डे हिने