कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीनं पुन्हा एकदा धाड टाकल. हसन मुश्रीफ यांच्या घरी चार ते पाच अधिकाऱ्यांचं पथक दाखल झालं. ईडीनं गेल्या दोन ते तीन महिन्यातील ही तिसरी कारवाई आहे. दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या फेर लेखापरिक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे ईडीचं पथक पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्या घरी दाखल झालं आहे.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स प्रकरण, आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स कंपनीनं चालवायला घेतला होता. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केला होता. यासंदर्भात ईडीनं यापूर्वी चौकशी केली होती. आता ईडीकडून धाडसत्र सुरु करण्यात आलं आहे.