Tuesday, February 11, 2025
Homeक्रीडाक्रीडा पानाचे जनक वि. वि. करमरकर यांचे निधन

क्रीडा पानाचे जनक वि. वि. करमरकर यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : मराठी वृत्तपत्रातील ज्येष्ठ क्रीडा संपादक वि. वि. करमरकर यांचे सोमवारी सकाळी मुंबईतील अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

क्रीडा पान सुरू करणारे माजी संपादक आणि देशी विदेशी खेळांना मानाचे स्थान देणारे वि. वि. करमरकर यांनी मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान मिळवून दिले. यासाठी एक पूर्ण पान तयार करून खेळांची आवड असणाऱ्या वाचकांची भूक त्यांनी पूर्ण केली. करमरकर यांच्या प्रयत्नांमुळे कालांतराने खेळांच्या बातम्यांना पूर्ण पान मिळाले. दैनिकांच्या जगातील हा पहिला प्रयोग होता. या प्रयोगाला वाचकांनी आणि खेळांची आवड असणाऱ्या खेळाडूंचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतर इतर दैनिकांनीही खेळांच्या बातम्यांसाठी पूर्ण पान देण्याचा निर्णय घेतला. परिणामी खेळांची आवड असणाऱ्या पत्रकारांसाठी पूर्ण वेळ नोकऱ्या उपलब्ध झाल्या. या सर्वांचे निर्माते करमरकर असल्याने ते क्रीडा पानाचे जनक म्हणून ओळखले गेले.

मूळचे नाशिकचे असलेले करमरकर यांनी एमए करत क्रीडा पत्रकरितेची वेगळी वाट निवडली. इंग्रजी वर्तमानपत्रात खेळांच्या बातम्या मोठ्या संख्येने असत. मात्र, मराठीत फारशा नसताना त्या आणून मराठी जगताला त्या वाचायला दिल्या पाहिजेत, यासाठी त्यांनी आपली लेखणी सतत प्रभावी आणि प्रवाहितपणे चालवत ठेवली. मराठी वाचकांसाठी क्रीडा जगतातील चौकार, षटकार, धावफलक, झटपट क्रिकेट, चौफेर फटकेबाजी, टे टे दापाझो, राकेफ असे अनेक सोपे सुटसुटीत शब्द याची निर्मिती त्यांनी केलीसोप्या शब्दांची निर्मिती त्यांनी केली. अंधेरी येथील पारशीवाडा स्मशानभूमी, अंधेरी पूर्व येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -