शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची आत्महत्या

लातूर: काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही आत्महत्या त्यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरीच केली आहे. चंद्रशेखर पाटील चाकूरकर (वय ८१ वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या चाकूरकरांच्या भावाचे नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे. तर चंद्रशेखर चाकूरकर यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.


चंद्रशेखर चाकूरकर हे शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ आहेत. हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते. दररोज सकाळी ते फिरायला घराबाहेर पडायचे. त्यानंतर ते स्वत:च्या घरी जाण्याऐवजी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी जात होते. तिथे चहा पाणी झाल्यावर तेथील पेपर वाचत बसणे ही त्याची खूप वर्षांपासूनची सवय होती. त्यानंतरच ते बाजूलाच असलेल्या स्वतःच्या घरी जात होते. तर शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबातील व्यक्ती हे लातूर येथील निवासस्थानी कधीतरीच हजर असतात. मात्र, आज शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे सकाळी घरातच होते.


दरम्यान सकाळी फिरून आल्यावर नित्याप्रमाने चंद्रशेखर चाकूरकर हे शिवराज चाकूरकर यांच्या घरी आले. घरात आल्यावर शैलेश पाटील यांनी त्यांना चहा घ्या मी आवरून येतो, असे सांगून निघून गेले. मात्र काहीवेळाने गोळीचा आवाज झाला. त्यामुळे घरातील नोकर आणि शैलेश पाटील हे धावत हॉलमध्ये आले. यावेळी त्यांना तिथे चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.



केला होता 'गुड बाय' चा मेसेज


चंद्रशेखर चाकूरकर आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी परिचित असलेल्या अनेकांना 'गूड बाय' असा मॅसेज करत 'गूड बाय' असा स्टेटसही व्हाट्स अॅपवर ठेवला होता. त्यामुळे त्यांचे आत्महत्या करण्याचे निश्चित झाले होते असाही संशय व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत