Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीकारमधून रस्त्यावरच्या कुंड्यांची चोरी करणारा अटकेत

कारमधून रस्त्यावरच्या कुंड्यांची चोरी करणारा अटकेत

नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेसाठी रस्त्यावर सुशोभिकरणासाठी लावण्यात आलेल्या कुंड्या चोरीप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी मनमोहन नावाच्या एका श्रीमंत व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्या कारमधून चोरीच्या कुंड्या आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे.

कार हरियाणातील हिसार येथून नोंदणीकृत असून आरोपी गुरुग्रामचा रहिवासी आहे. चोरट्याच्या लक्झरी कारचा नंबरही व्हीआयपी आहे. चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जीएमडीएने पोलिसांत तक्रार दिली होती.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ गुरुग्राममधील शंकर चौकातील आहे. व्हिडीओमध्ये एक गाडी येऊन थांबते असे दिसते. दोन जण गाडीतून खाली उतरतात. चौकात सजावटीसाठी ठेवलेल्या विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींच्या कुंड्या उचलून गाडीच्या डिक्कीत ठेवली जातात.

गुरुग्रामच्या एम्बियंस मॉलमधील लीला हॉटेलमध्ये जी-२० परिषदेची तयारी बऱ्याच दिवसांपासून जोरात सुरू आहे. यामध्ये परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना प्रभावित करण्यासाठी शहर सजवले जात आहे. रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या फूटपाथवरही खास प्रकारची रोपे लावली जात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -