शासन कांदा उत्पादक शेतक-यांच्या पाठीशी - मुख्यमंत्री

मुंबई : कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत बोलताना सांगितले.


मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे. आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषापेक्षा जास्त मदतही केली आहे. नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरु झाली आहे. २.३८ लाख मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला आहे. जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरु करण्यात येईल. कांदा निर्यातीवर देखील बंदी नाही. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना सुद्धा आवश्यकतेनुसार मदत जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


कांद्याचे दर कोसळल्याने नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत आज छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.

Comments
Add Comment

Kishori Pednekar : महापौरांचा सन्मान ते बाळासाहेबांचा अवमान

- विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या बाळासाहेबांबद्दल काय आक्षेपार्ह बोलल्या मुंबइ (विशेष

Sion Flyover : शीव उड्डाणपूलाचे काम १५जुलै २०२६पर्यंत पूर्ण करा, आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मलजल प्रक्रिया केंद्र अत्यंत

Mumbai : मुंबईत नव्याने रस्ते खोदण्यास ३० एप्रिलनंतर मनाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा

Mumbai Water Cut : मुंबईत सोमवारी ५ टक्के पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलबोगदा क्रमांक १ व जलबोगदा क्रमांक २ यांचे भरण अर्थात

CBSE : ‘सीबीएसई’ दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर आणि आयुक्तांनी केला सत्कार

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत संचलित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ

Haryana Pattern : कंत्राटी कामगारांसाठी 'हरियाणा पॅटर्न'चा अभ्यास करणार

मुंबई : महाराष्ट्रातील कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध असून, विशेषतः कंत्राटी