स्टंटबाजी करणा-या रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार?

भाजप निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार!


पुणे : आचार संहितेचा भंग केला म्हणून भाजपच्या शिष्टमंडळाने रवींद्र धंगेकर यांची पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल केली आहे. तसेच भाजप निवडणूक आयोगात देखील तक्रार दाखल करणार आहे. यामुळे आता धंगेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


कसबा विधानसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडी प्रचार संपल्यानंतरही थांबायला तयार नाहीत. कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानाला आता २४ तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक असताना कसब्यात भाजपने पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला. धंगेकर यांनी फक्त आरोप केला नाही तर ते आज सकाळी कसबा गणपतीसमोर उपोषणाला बसले होते. संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर धंगेकरांनी हे उपोषण मागे घेतले आहे.


तर धंगेकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी भाजप करणार आहे. भाजपचे संघटन मंत्री राजेश पांडे यांनी ही माहिती दिली.


राजेश पांडे म्हणाले, "महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पराभव स्पष्ट दिसत आहे. आजचे उपोषण हा त्यांचा स्टंट आहे. यापूर्वी देखील त्यांनी असे स्टंट केले आहेत. कसब्यातील जनतेला हे माहित आहे. धंगेकर यांच्या रॅलीला प्रतिसाद मिळाला नाही. धंगेकरांच्या स्टंटबाजीमुळे कसब्यातील मतदार दुखावला आहे."


निवडणूक आयोगाच्या नियमानुसार काल ५ वाजता प्रचार संपला आहे. तर आज कसबा गणपतीसमोर हा प्रचाराचा भाग होत नाही का, असा माझा सवाल असल्याचे राजेश पांडे म्हणाले.

Comments
Add Comment

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’