लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला!

  161

मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंतचा ब्राइडल लूक असलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ड्रामा क्वीन नववधू दिसत आहे.


अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिच्या निकाह आणि कोर्ट मॅरेजचे फोटो व्हायरल झाल्यापासून राखीने आदिल दुर्रानीवर अनेक आरोप केले. हे प्रकरण आता इतके वाढले आहे की ड्रामा क्वीनचा नवरा आदिल तुरुंगात आहे.



याच दरम्यान, आता राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ड्रामा क्वीन नववधू दिसत आहे. राखीच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.


राखी सावंतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ड्रामा क्वीनला नववधूच्या वेषात पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. राखी पुन्हा लग्न करणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पे अकाऊंट विरल भयानीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये खुद्द राखी सर्व प्रश्नांची उत्तरे देताना आदिलबद्दलही बोलली आहे. रितेशनंतर पुन्हा एकदा राखी सावंतच्या लव्ह लाईफवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तिचा पती आदिल दुर्रानी तुरुंगवास भोगत आहे.


राखी पुन्हा शूट मोडमध्ये आली आहे आणि नुकतेच तिने वधूच्या रूपात शूट केले आहे. यादरम्यान हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे. राखीने आपण पुन्हा लग्न करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, ती केवळ शूटिंगसाठी वधू बनली आहे. व्हिडिओमध्ये राखी सावंत म्हणताना दिसत आहे, "मी एकदाच लग्न केले आहे, पुन्हा कधीच नाही. मला आयुष्यात पुन्हा लग्नाचा पोशाख घालायचा नाही." आदिलबद्दल बोलताना ती म्हणाली, "माझा एकच नवरा आहे, तो तुरुंगात आहे."





राखीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती शूटिंग लोकेशनवर तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये प्रवेश करताना तिच्या पतीबद्दल बोलत आहे. आदिलबद्दल बोलताना ड्रामा क्वीन म्हणाली, "वधू आली आहे, वर तुरुंगात आहे. आज रडू नकोस, फक्त आनंदी राहा. मी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहे." राखी सावंतने आदिलवर मारहाण आणि पैसे चोरल्याचा आरोप केला आहे. यासोबतच आदिलचे इतर मुलींसोबतही संबंध असल्याचा खुलासा राखीने केला आहे.

Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमाचा टीझर रिलीज, दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसानिमित्त खास भेट

मुंबई : ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या आगामी 'दशावतार'

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राणी मुखर्जीने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, फोटो झाले व्हायरल

मुंबई: 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

'दशावतार'च्या गूढ पोस्टरने वाढवली उत्सुकता; १२ सप्टेंबरला उलगडणार रहस्य!

मुंबई: झी स्टुडिओज प्रस्तुत आणि ओशन फिल्म कंपनी व ओशन आर्ट हाऊस निर्मित 'दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचे

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

बालकलाकार, तांत्रिक पुरस्कारांतही मराठी कलावंतांचा डंका नवी दिल्ली  : चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या

Rani Mukherji Reaction: पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राणी मुखर्जी काय म्हणाली?

३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर राणी मुखर्जीने मिळवला पहिला राष्ट्रीय पुरस्कार Rani Mukherji Reaction on First national Award: राणी