'भावी मुख्यमंत्री' पोस्टर्स पाहुन संतापल्या सुप्रिया सुळे

मुंबई: सध्या सोशल मिडियावर सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री असा मजकूर असलेल्या पोस्टर्सची जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे फोटो लावलेले या मजकुरासोबतचे पोस्टर्स मुंबईत काही ठिकाणी लावण्यात आले होते. या पोस्टरगिरी बाबत सुप्रिया सुळे यांनी नाराजी दर्शवत मुंबई पोलिसांनी लवकरात लवकर पोस्टर लावणाऱ्याचा शोध घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती केली आहे.


आज बारामती दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या, 'एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे पोस्टर कोणी लावलं, याचा पुरावा असला पाहिजे', असेही सुळे यावेळी म्हणाल्या.


'उद्या तुमच्या कुटुंबातील पत्नी, मुलीचा असा फोटो लागला तर तुम्हाला चालेल का?' असा प्रतिप्रश्न सुळे यांनी यावेळी केला. पोस्टरबाबत पत्रकारांकडूनच मला माहिती मिळाली. ते पोस्टर कोणत्या पक्षाने लावले आहेत का? याची माहिती मुंबई पोलिसांनी मिळवावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.


सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या पोस्टरवरही प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील यांचे पोस्टर त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावले होते. मात्र माझ्या आणि अजितदादांच्या पोस्टरमध्ये साम्य आहे. दोन्ही पोस्टरवर पोस्टर लावणाऱ्याचं नाव नाहीये. त्यामुळे हा आमच्या दोघांवर अन्याय आहे.


सुप्रिया सुळे सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या तेथील गावांना भेटी देत आहेत.

Comments
Add Comment

मंडला ते चेंबूर हा मेट्रो २ बीचा पहिला टप्पा सुरू होणार

मुंबई  : मुंबईमध्ये लवकरच आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महिन्यातच

कफ परेडच्या आगीत एकाचा मृत्यू, ३ जण गंभीर ; एकाची प्रकृती चिंताजनक

मुंबई: कफ परेड येथील मच्छीमार नगर परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास एका चाळीत भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना

गेल्या बावीस महिन्यांत फटाक्यांमुळे १८२ आगी

शिंपोलीत फटाक्याच्या रॉकेटमुळे चार दुकानांना आग मुंबई : मुंबईत यंदा दीपावलीच्या सणानिमित्त केल्या जाणाऱ्या

आज आहे लक्ष्मीपूजन: धन, समृद्धी आणि ऐश्वर्याचे स्वागत!

मुंबई : लक्ष्मीपूजन हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील मुख्य

महायुतीच्या आमदारांना सामाजिक न्याय मंत्र्यांकडून प्रत्येकी २ कोटींचा विकासनिधी वाटप

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रथमच निवडून आलेल्या

अल्पवयीन मुलींना दारू पाजल्याचा आरोप, अंधेरीतील 'हॉप्स किचन अँड बार'वर गुन्हा दाखल

मुंबई: अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील 'हॉप्स किचन अँड बार' या पबच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध