जिंदाल कंपनीच्या आगी प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

इगतपुरी (प्रतिनिधी): जिंदाल कंपनीला लागलेल्या आगी प्रकरणी सात जणांवर घोटी पोलीस ठाण्यात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे


एक जानेवारी रोजी, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील जिंदाल कंपनीमध्ये मोठ्या स्वरुपात आग लागली होती. या घटनेमध्ये तीन कामगार महिमा कुमारी प्रल्हाद सिंग, अंजली रामकुबेर यादव, सुधीर लालताप्रसाद मिश्रा हे मयत झाले होते व २२ कामगार जखमी झाले होते. घोटी पोलीस स्टेशन येथे या घटनेबाबत अकस्मात मृत्यु तसेच अकस्मात जळीत दाखल करण्यात आले होते. अकस्मात जळीताची चौकशी सपोनि खेडकर हे करीत होते.


या अकस्मात जळीताचे चौकशीचे अनुषंगाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, व संबंधित विभागांना पत्रव्यवहार करुन अहवाल मागविण्यात आले होते. त्याचबरोबर कंपनीचे सेफ्टी ऑडीट रिपोर्ट व इतर कागदपत्रे प्राप्त करण्यात आली होती. सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता, ज्या बॅच पॉली प्लॅन्टमध्ये प्रथमतः आग लागली होती, तो बॅच पॉली प्लॅन्ट हा सुमारे दिड महिन्यांपासुन बंद होता. हा प्लॅन्ट सुरु करण्यापुर्वी त्याची तपासणी व दुरुस्ती होवुन, तो सुरु करताना एस ओ पी चे पालन न केल्याने, प्लॅन्टमधून थर्मिक फ्लुईड ऑइलची गळती होवुन हि आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा तपास नाशिक चे उपविभागीय पोलीस अधिकारी, ग्रामीण अर्जुन भोसले हे करीत आहेत.

Comments
Add Comment

पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणात शितल तेजवानींची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली पाच तास चौकशी!

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या फर्मशी संबंधित पुणे जमीन व्यवहार प्रकरणात पुणे

धक्कादायक! नाशिकनंतर पुण्यातही चिमुकलीवर अत्याचार, ऊसतोड कामगाराचे अमानुष कृत्य

पुणे: नाशिकच्या मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येचा विषय ताजा असतानाच, पुण्यातून एक बातमी समोर आली

पुण्यात म्हाडाची मोठी घोषणा; ४ हजारांहून अधिक घरांसाठी वाढीव मुदत

पुणे : पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे,

पुणे गृहनिर्माण मंडळातर्फे करण्यात येणाऱ्या सदनिका सोडतीच्या अर्जाची मुदत वाढली

पुणे: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व

४५ आयटीआयमध्ये सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी

८ हजार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मुंबई : राज्यातल्या तरुणांना दर्जेदार रोजगाराभिमुख औद्योगिक प्रशिक्षण

राज्यातील फार्मसी अभ्यासक्रमांच्या यंदाही २५ ते ३० टक्के जागा रिक्त

मुंबई  : कोरोना महामारीत फार्मसी उद्योगाला मिळालेल्या महत्त्वामुळे या क्षेत्रातील अभ्यासक्रमांची लोकप्रियता