नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयाबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट उद्या दुपारी साडेतीन वाजता सुनावणी करणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आजपासून तीन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टात तूर्तास पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी पार पडत आहे.
या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ठाकरेंच्या याचिकेची सुनावणी घेण्यात येणार आहे. थोडक्यात आज सुनावणी घेण्याची मागणी मान्य झाली नसली तरी उद्या मात्र यावर सुनावणी होणार आहे. याचिका आम्ही पूर्णपणे वाचलेली नाही, त्यामुळे उद्या दुपारी या संदर्भात सुनावणी घेण्यात येईल, असे कोर्टाने म्हटले आहे.
दरम्यान, ठाकरे गटाने याप्रकरणी सुप्रीम कोर्टात येण्याची गरज नाही. यापूर्वी देखील ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र दोनदा हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर चर्चा नको, असे शिंदे गटाचे वकिल कौल म्हणाले असले तरी उद्या दुपारी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकले जाईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
ठाकरे गटाच्या याचिकेचे मेन्शनिंग करण्यास काल सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते. निवडणूक आयोगाने शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह बहाल केलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. यावर काल तात्काळ सुनावणीस सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून आव्हान दिले जाण्याची शक्यता गृहित धरून शिंदे गटाने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. आमचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी विनंती शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाला केली होती.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…