नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांकरिता आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कसोटीतील पहिले दोन सामने जिंकून २-० अशी आघाडी घेणाऱ्या भारताने शेवटच्या दोन सामन्यांमध्ये संघात कोणताही बदल केलेला नाही. एकदिवसीय मालिकेत मात्र गोलंदाज जयदेव उनाडकट आणि रवींद्र जडेजा यांचे पुनरागमन झाले आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माकडे नेतृत्व, तर हार्दिक पंड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कौटुंबिक कारणामुळे रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली. अशा स्थितीत हार्दिक पहिल्या वनडेत संघाची कमान सांभाळणार आहे.
कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या(उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.