राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप

मुंबई : बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत. त्यातच राज्यातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे कर्मचारीच असल्याने कॉलेज बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. आश्वासित प्रगती योजना, ५८ महिन्याची थकबाकी, १४१० कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं आंदोलन करण्यात आले आहे.


विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी अनकेदा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. याबाबत अनेकदा बैठका झाल्या. प्रत्येकवेळी मागण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मागण्या मान्य होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर गेल्या तीन वर्षांपासून या प्रलंबीत मागण्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. मात्र तरीही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.

Comments
Add Comment

Pune Crime News : आधी अपहरण, मग हत्या अन् थेट...पुण्यातील १७ वर्षांच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, भयानक प्रकार उघड

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाचा

जळगावात महायुतीचे शक्ती प्रदर्शन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रॅलीला प्रचंड गर्दी जळगाव : जळगाव शहरात मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतील सात प्रभागांमध्ये युती आणि आघाडीचे उमेदवारच आमने-सामने

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा महायुती तसेच उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस

शॉर्ट सर्किटमुळे ‘समृद्धी’वर खासगी बसला अपघात

३६ प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला मलकापूर (प्रतिनिधी) : मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर

राजमाता जिजाऊ बदनामी प्रकरणात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २२ वर्षांनंतर मागितली माफी

पुणे : जेम्स लेनच्या 'शिवाजी-हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकावरून दोन दशकांपूर्वी

पुणे : कोथरुडमध्ये उबाठा उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कोथरुड विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग