अकोला : उद्धव ठाकरेंचं चिन्ह गेलं, पक्षही हातातून गेला, आता नवा मित्रही पलटला अशी स्थीती निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मनोमिलन कायम राहिलं तर काय? असा प्रश्न आजच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना विचारला. त्यावर ‘तर आम्ही पुन्हा एकटे’ असं मोठं विधान त्यांनी केलं.
ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंसोबत आम्ही गेलोच होतो पण उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमात बुडालेले आहेत. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्षाकडून आम्हाला निमंत्रण आलेले नाही. त्यामुळे मग आम्ही पुढचा विचार का करु, अशापद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याबाबत नकाराचे संकेत प्रकाश आंबेडकरांनी दिले.
तसेच, एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे या दोघांमधील भांडण सोडवायला मी जाणार नाही. ज्यांचे-ज्यांचे भांडण आहे त्यांनी-त्यांनी ते आपापसात बसून सोडवावे. मी शक्यतो अशा भांडणात पडत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…