मैथिली जावकर ‘अशीच आहे चित्ता जोशी’मध्ये पंचरंगी भूमिकेत

'अशीच आहे चित्ता जोशी'मध्ये मैथिली जावकर सोबत स्टारपुत्र अभिनेता रणजीत जोग नायकाच्या भूमिकेत तर लोकप्रिय गायिका - संगीतकार वैशाली सामंत नाटकाला प्रथमच संगीत देताना दिसणार आहे.


प्रख्यात दिग्दर्शिका सुधाताई करमरकर, प्रयोगशील दिग्दर्शक चेतन दातार आणि प्रतिभावंत दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्या तालमीत अभिनयाचे धडे गिरवून, नंतर व्यावसायिकला प्रकाश बुद्धिसागर, दिलीप कोल्हटकर, गणेश यादव, संतोष पवार आणि चंद्रकांत कुलकर्णी अशा मातब्बर दिग्दर्शकांसोबत थिएटर करत रंगभूमीवर पाय रोवून भक्कमपणे आपलं अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी असलेली लोकप्रिय अभिनेत्री मैथिली जावकर आज अभिनय, नृत्य, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी पंचरंगी लीलया पेलत लवकरच रसिकांना नव्या साजात दिसणार आहे. तिच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ‘अशीच आहे चित्ता जोशी’ या महत्त्वाकांक्षी नाटकाद्वारे ती येत्या १९ फेब्रुवारीपासून पुन्हा रंगमंचावर अवतरणार आहे.


‘संस्कार भारती’ यांच्या सहयोगाने, ‘ओम साईनाथ प्रॉडक्शन्स’ निर्मित, श्री चित्र - चित्रलेखा प्रकाशित २ अंकी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ‘अशीच आहे चित्ता जोशी’ या अत्यंत वेगळ्या संवेदनशील नाटकाची लेखिका, निर्माती, दिग्दर्शिका आणि चित्ता जोशी या शीर्षक भूमिकेत मैथिली जावकर रंगमंचावर लवकरच दिसणार आहे. तसेच घराघरात लोकप्रिय झालेल्या रामायण मालिकेतील भरत अर्थात अभिनेते संजय जोग यांचा सुपुत्र आणि आजच्या टेलिव्हिजन युगातला चमचमता तारा, अभिनेता रणजीत जोग या नाटकात प्रमुख नायकाच्या भूमिकेत आहे. सध्या मुंबईतील पार्ले परिसरात या नाटकाच्या सपाटून तालमी सुरू असून १९ फेब्रुवारीला या नाटकाचा रंगमंचावर शुभारंभ होणार आहे.


मैथिली जावकर या गुणी अभिनेत्रीने चित्रपट, नाटक, मालिका अशा सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. अभिनय, नृत्य निर्मिती अशा सर्व आघाड्यांवर त्यांनी अनेक वर्ष काम करून आपला एक प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. भरतनाट्यम या नृत्यकलेत पारंगत असलेल्या मैथिली जावकर हिने आजमितीस शेकडो व्हीडिओ अल्बम्स, लावणी, लोकनृत्याचे शो प्रत्यक्ष सादर केले आहेतच, पण त्यासोबत स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘अग्निहोत्र,’ ‘वादळवाट,’ ‘चार दिवस सासूचे,’ ‘दामिनी,’ ‘घरकुल’ ‘इन्स्पेक्टर’ अशा ३७ मराठी मालिका तसेच ‘चारचौघी,’ ‘शोभायात्रा,’ ‘वा सुनबाई वाह!,’ ‘आई परत येतेय’ ‘बायको असून ब्रम्हचारी!,’ तसेच सहकुटुंब.कॉम, दांडेकरांचा सल्ला अशा अनेक लोकप्रिय १८ नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. आधारस्तंभ, छबू पळाली सासरला, आई मला माफ कर, आता मी कशी दिसते?, बायको आली बदलून, आयला लोच्या झाला रे, खंडोबाच्या नावाने चांगभलं, माहेरचा निरोप, शांतीने केली क्रांती, मेनका उर्वशी इत्यादी २२ मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. तिने कलर्स मराठीच्या मराठी बिग बॉस सीझन २ शोमध्येही सहभाग घेतला होता.


अत्यंत वेगळ्या धाटणीच्या ‘अशीच आहे चित्ता जोशी’ या नाटकाच्या निमित्ताने मैथिली व्यावसायिक नाटकाची लेखिका आणि दिग्दर्शिका बनते आहे. या नाटकात रणजीत संजय जोग, रुचीर गुरव (स्वाभिमान फेम मयंक) यांच्याही प्रमुख
भूमिका आहेत.

Comments
Add Comment

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण...

नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे.

ग्रामीण मनोरंजनासाठी ‘किस्सा शुरू टॉकीज’!

ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने नवीन चित्रपट पाहण्यासाठी

Deepa Sawant-Khot : मर्डर मिस्ट्रीची ‘तलास’

कलेची आवड माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यातून मार्ग काढून त्या कलेची

Usha Nadkarn : स्पष्ट बोलण्यास कारण की...

स्पष्टवक्तेपणा या स्वभावामुळे मराठी कलाक्षेत्रात ज्या दोन व्यक्तींना प्रामुख्याने ओळखले जाते; त्या वक्ती

Pedii Box Office Collection : पेड्डीचा बॉक्स ऑफिसवर धडाका! 2 दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) यांचा बहुचर्चित 'पेड्डी' (Peddi) चित्रपट बॉक्स